प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यात भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. सध्या मुख्यमंत्री हे दिल्लीत असून त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी तब्बल 40 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष, सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या अधिकृत दर्जाबाबत चाललेली लढाई आणि आगामी दसरा मेळावा याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे.Eknath shinde meets Amit Shah : extended Delhi tour, is it a preparation of another political explosion in maharashtra??
पण मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा लांबल्यामुळे राजकीय वर्तुळात याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिंदे गट अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दसरा मेळाव्याला निमंत्रित करून महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक मोठा राजकीय धमाका घडवून आणणार अशी ही चर्चा आहे.
शिंदे-शहा भेट
विविध 13 राज्यांतील शिवसेनेचे राज्य प्रमुख हे बुधवारी शिंदे गटात सहभागी झाले.
ज्यावेळी उद्धव ठाकरे हे गोरेगावात नेस्को संकुलात ठाकरे गटाच्या शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा घेत होते तेव्हाच एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जाहीर कार्यक्रम घेतला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात येण्यासाठी रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण त्यांनी आपला मुक्काम वाढवला. केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री गुरुवारी देखील दिल्लीत असल्याचे सांगण्यात येत होते.
पण गुरुवारी दिवसभरात त्यांची एकाही केंद्रीय मंत्र्यांसोबत त्यांची भेट होऊ शकली नाही. गुरुवारी रात्री केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट घेत राज्यातील विकासकामांबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत सांगितले आहे.
गुरुवारी राज्यातील विविध कामांसाठी मुख्यमंत्री शिंदे हे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण काही कारणांमुळे या भेटी होऊ शकल्या नसून मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन सर्वांशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App