प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला समोरासमोर बसून चर्चा करून तोडगा काढू, असे समेटाचे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे त्यांनीच एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या फायली तपासासाठी मागून घेतल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाची पाळेमुळे नगरविकास खात्याच्या फायलींमध्ये तर नाहीत ना??, याचा तपास मुख्यमंत्री करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून ट्विट करत काही परखड सवाल विचारले आहेत. एकीकडे आपण समेटाची भाषा वापरून आम्हाला मुंबईत परत येण्यासाठी आवाहन करता आणि दुसरीकडे संजय राऊत, आदित्य ठाकरे हे गटारीतली घाण, रेडे, कुत्रे, जाहील असे शब्द वापरून शिवसेनाप्रमुखांच्या प्रिय शिवसैनिकांचा अपमान करतात. याचा नेमका अर्थ काय??, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे केला आहे. एकनाथ शिंदे यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी देखील आपला एक व्हिडिओ जारी केला असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर उघडपणे आरोप केले आहेत.
– कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची ट्विट :
– एकनाथजी शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्व शिवसैनिकांनी बळी पडू नये ही
– वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत.
– मविआतील घटकपक्ष राष्ट्रवादी आमचा परंपरागत विरोधक असून माझ्या मतदारसंघात मी पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला उपमुख्यमंत्री यांचेकडून ताकद मिळते.म्हणून मविआ आम्हाला मान्य नाही.
– एकनाथ शिंदे यांचे ट्विट
– एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय?
– शहाजीबापू पाटील यांचे ट्विट
सांगोला मतदारसंघातील विकासनिधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला असून मविआला आमचा विरोध आहे.एकनाथजी शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही.जेकाही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने व शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती
– सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App