एकनाथ खडसे यांचा पाय खोलात, जावयाला मनी लॉड्रिंगअंतर्गत गुन्ह्यातील जामीन अर्ज फेटाळला


विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. तयंचे जावई गिरीश चौधरी याच्याविरोधात ईडीने मनी लॉड्रिंगअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. त्या प्रकरणी चौधरी याने दाखल केलेला जामीन अर्ज विशेष न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. Eknath Khadse’s son in laws bail application for money laundering rejected

विशेष पीएमएलए न्यायालयाने यापूर्वी गिरीश चौधरी याच्या कोठडीत वाढ केली होती. भोसरी भूखंड व्यवहारप्रकरणी ईडीने चौधरी याला अटक केली. याआधी मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडीने एकनाथ खडसे, त्यांची पत्नी, चौधरी आणि भूखंड मालकावर गुन्हा नोंदविला होता.



संबंधित भूखंड एमआयडीसीचा असल्याचे चौधरी याला माहीत होते. मात्र, सरकारकडून ५०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी कुहेतूने चौधरी यांनी भोसरी येथील भूखंड खरेदी केला, असा दावा ईडीने केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीने एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईसीआयआर दाखल केला आहे.

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यात खडसे यांची ईडीने तब्बल नऊ तास चौकशी केली होती. विविध बोगस कंपन्यांच्या माध्यमातून एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी भूखंड खरेदीसाठी पैसे जमवल्याचा संशय ईडीला आहे. यात सरकारचा सुमारे 61 कोटी 25 लाख रुपयांचा महसूल बुडविला. मंत्री पदाचा गैरवापर करून 31 कोटींचा भूखंड खडसेंनी 3 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतला, असा खडसे यांच्यावर आरोप आहे.

Eknath Khadse’s son in laws bail application for money laundering rejected

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात