पवारांना रावेरमध्ये घडवायची असलेली नणंद – भावजयीची लढत एकनाथ खडसेंनी टाळली!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय अशी पवार घराण्यातच लढत होण्याची दाट शक्यता असताना स्वतः शरद पवारांनी त्याचे वेगळे रिपीटेशन रावेर लोकसभा मतदारसंघात घडवून आणायचा मनसूबा आखला होता, पण एकनाथ खडसेंनी तो टाळला.Eknath khadse averted family fight in raver loksabha constituency

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे, तर त्यांच्या विरोधात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर उतरवायचा पवारांच्या मनसूबा होता. त्यासाठी कालच पवारांनी एकनाथ खडसे यांची बंद दाराआड चर्चा केली होती पण आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि रावेरच्या लढती संदर्भात वेगळा खुलासा केला.



रावेर लोकसभा मतदारसंघात आपणच निवडणूक लढवणार होतो. परंतु डॉक्टरांनी वैद्यकीय कारणासाठी आपल्याला ती परवानगी दिलेली नाही. रोहिणी खडसे या विधानसभा निवडणुकीची गेल्या चार-पाच वर्षांपासून तयारी करत आहेत. त्यामुळे त्या विधानसभा निवडणूक लढवतील. रावेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच जिंकेल. उद्यापर्यंत इच्छुक उमेदवारांची छाननी करून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर करू, असे एकनाथ खडसे यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

अर्थातच बारामतीचे रिपीटेशन रावेरमध्ये घडविण्याचा पवारांचा मनसूबा एकनाथ खडसे यांनी हाणून पाडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी देखील त्यांनी सावध भूमिका घेत टीका करणे टाळले. एकनाथ खडसे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये यायचे आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांची संपर्कही साधला आहे, असा गौप्यस्फोट राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींवर टीका करणे टाळल्याने खडसे यांच्या भाजप प्रवेशाविषयीचा संशय वाढला आहे.

Eknath khadse averted family fight in raver loksabha constituency

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात