विशेष प्रतिनिधी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवडाभरापासून खडसे यांची प्रकृती बिघडली आहे. Eknath Khadse admitted to Bombay Hospital due to ill health
मूत्रमार्गाचा संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीमध्ये अडकले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामध्ये गिरीश चौधरी हे अटकेत आहेत. तर एकनाथ खडसेंना देखील ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App