पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासमोर खड्डे; ठाणे पुन्हा गेले खड्ड्यात


विशेष प्रतिनिधी

ठाणे : ठाण्यात पावसाने पुन्हा जोर पकडला असून बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर खड्डेमय पडले आहेत. या खड्ड्यांतून वाट काढताना प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय… दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी ठाणे महापालिका दोन कोटींहून अधिक खर्च केला जात असतो. मात्र प्रत्यक्षात खड्डे बुजवले जात नाहीत. Pot Holes In front of Guardian Minister Eknath shindes Bungalow in Thane

धक्कादायक म्हणजे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्या समोरील रस्तेचे खड्डेमय झाले आहेत.
ठाण्यात शहरातील तीन हात नाका, नितीन कंपनी, घोडबंदर सर्विस रोड, कोपरी, तसेच दिवा शहराला खड्ड्यांनी व्यापले आहे. काही ठिकाणी विकास कामे सुरू आहेत तर पूर्व द्रुतगती महामार्गावर मेट्रोचे काम जोरात सुरू असल्याने रस्त्याला खड्डे पडलेत.
कंत्राटदार वरवरची कामे करतात. काही ठिकाणी मलमपट्टी करण्यात येतेये… दरवर्षी खड्ड्यांमुळे अनेक वाहन चालकांचे मृत्यू झालेल्या घटना घडल्या आहेत.

ठाण्यातील लुईसवाडी परिसरात द्रुतगती मार्गाच्या शेजारील सर्व्हिस रोडवर वर्षाचे बाराही महिने खड्ड्यांचे साम्राज्य असते व वाहनचालक घाबरुन गाडी चालविताना दिसतात… प्रशासन आणि पालिका आयुक्तांनी पाहणी दौरे करून फक्त फेरफटका मारला की काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे… कारण रस्त्यांवर खड्डे पडतात पावसामुळे असा अजब दावा पालिकेचा आहे…

सध्या रस्त्यावर पाणीच पाणी असून त्यात लपलेल्या धोक्याने ठाणेकर वाहनचालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.दस्तुरखुद्द नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेरच प्रचंड खड्डे पडले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे ज्या रस्त्याने सतत ये जा करतात त्या रस्त्यालाच खड्ड्यांचा विळखा पडला असल्याने आता दाद कोणाकडे मागायची, असा सवाल ठाणेकर नागरिक विचारत आहेत.

  • एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेरच प्रचंड खड्डे पडले
  • मग दाद कोणाकडे मागायची ?
  • ठाण्यात डांबरी रस्ते उखडून पडले मोठे खड्डे
  • पावसाचे पाणी साचल्याने खड्डे दिसत नाहीत
  • अनेकदा अपघात होऊन अनेकांचा जीव धोक्यात
  • दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी दोन कोटींहून खर्च
  • सर्व्हिस रोडवर बाराही महिने खड्ड्यांचे साम्राज्य

Pot Holes In front of Guardian Minister Eknath shindes Bungalow in Thane

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात