प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवारांना महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा घसरल्याची चिंता लागून राहिली. त्यांनी या चिंतेविषयीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पाठविले. मात्र या मुद्द्यावर आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा घसरला ते सर्वेक्षण महाविकास आघाडीच्या काळातले आहे, असे उत्तर फडणवीस यांनी दिले. Educational standards declined but that was during the Mahavikas Aghadi period
शरद पवार यांनी राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पत्र लिहिलं होतं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पंजाब, गुजरात, राजस्थान वगळता महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्र पुढेच आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शरद पवार पत्रात काय म्हणाले होते?
“केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.० (पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्र राज्याची दुसर्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. राज्याच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाच्या दृष्टीकोनातून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. ज्या निकषांच्या आधारे हे मूल्यमापन केले जाते. त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, पायाभूत सुविधा, बदलती शैक्षणिक प्रक्रिया आदी मुद्द्यांचा समावेश होतो. परंतु परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.0 (पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्रात या महत्वपूर्ण घटकांना गांभीर्याने घेतले गेल्याचे दिसून येत नाही,” अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली होती.
पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या पत्रावर भाष्य केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवार यांनी आम्हाला दोन दिवसांपूर्वी पत्र लिहित महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता सातव्या क्रमांकावर गेल्याचं सांगितलं होतं. हे बरोबर नाही आहे. त्यातील सर्वे हा महाविकास आघाडीच्या काळातील आहे. तरीही कोणाचं सरकार आहे, हे महत्वाचं नाही.”
“या मूल्यांकनात 10 श्रेणी करण्यात आल्या होत्या. त्यातील 5 श्रेणीत कोणतंच राज्य नव्हते. सहाव्या श्रेणीत चंडीगढ आणि पंजाब आहे. सातव्या श्रेणीत महाराष्ट्र आहे. पहिल्या पाच श्रेणीत कोणतेही राज्य न ठेवल्याने महाराष्ट्र दुसऱ्याच क्रमांकावर आहे,” असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे.
“पंजाब, राजस्थान, गुजरात वगळता महाराष्ट्र पुढेच आहे. त्यामुळे महाराष्ट्र मागे गेला अशी परिस्थिती नाही,” असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App