कोणाचा व्हिप कोणाला लागू??; विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादीच्या आमदारांची शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ परीक्षा!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ अशी परीक्षा आज पासून सुरू होणार आहे. Whose whip applies to whom ajit pawar or sharad pawar

महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार 17 जुलैपासून सुरूवात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर होणारे हे पहिलंच अधिवेशन आहे. 2 जुलैला अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आपल्यासोबत सर्वाधिक आमदार असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे, एवढच नाही तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा सांगितला आहे. निवडणूक आयोगालाही याबाबत माहिती देण्यात आली असून अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचे त्यात नमूद केले आहे.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची यावरून वाद सुरू असतानाच अधिवेशनामध्ये व्हीप कुणाचा लागणार? याबाबतही संभ्रम आहे. अजित पवार गटाने अनिल पाटील यांची प्रतोद (व्हीप) म्हणून तर शरद पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे. व्हिपच्या या गोंधळावरून अजित पवार यांनी राज्य सरकारने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी सूचक विधान केले. घोडा मैदान काही लांब नाही, उद्यापासून तुम्ही बघाल, असे अजित पवार म्हणाले.


Sharad Pawar : फडणवीस – राज ठाकरेंशी पंगा वाढवायची राष्ट्रवादीची तयारी!!; दिलीप वळसेंच्या टार्गेटवर फडणवीस – राज!!


अधिवेशनात सरकारची भूमिका काय?

‘सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाची उपस्थिती ठेवणे, आयुधांचा वापर करून योग्य पद्धतीने काम करू. लोकशाही आम्हाला माहिती आहे, सगळे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पावसाचं प्रमाण म्हणावं तसं नाही, पण हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाने पाऊस पडला तर बळीराजा समाधानी राहील. उत्तरात थातूर मातूर सांगण्याचंकाम सत्ताधारी पक्षाकडून होणार नाही. आम्ही विरोधकांना व्यवस्थितपणे उत्तर देण्याचं काम करू. काल आम्ही नाशिकमध्ये होतो, तिथे 11 कोटींचं काम केले, असे अजित पवार म्हणाले.

‘सगळ्यांना सूचना दिल्या आहेत, त्यानंतर महिलांबद्दल अपशब्द वापरले जात नाहीत. एकाच वेळी दोन्ही सभागृहात प्रश्न आल्यास आमच्यापैकी मुख्यमंत्री किंवा दोन उपमुख्यमंत्री यांच्यापैकी एक जण तिथे उपस्थित राहून उत्तर देतील, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Whose whip applies to whom ajit pawar or sharad pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात