मनी लाँड्रिग प्रकरण : चौकशीला गैरहजर राहिल्याने ईडीचं पाऊल
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने झटका दिला आहे. देशमुख यांच्याविरुद्ध ईडीने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांना आता देश सोडून जाता येणार नाही. ED’s lookout notice against Anil Deshmukh: No ban on leaving the country
100 कोटी रुपयांचे वसुली आदेश दिल्याच्या आरोपातील मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. या लूकआऊट नोटीसमुळे अनिल देशमुखांना देश सोडता येणार नाही. अनिल देशमुख यांना चौकशीसाठी आतापर्यंत 5 वेळा समन्स पाठवण्यात आलं आहे, मात्र ते ईडीसमोर हजर झाले नाहीत, त्यामुळे ईडीने लूकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती आहे.
100 कोटी वसुली प्रकरणात सध्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी केली जात आहेत. या प्रकरणात ईडीकडून अनिल देशमुख वारंवार समन्स बजावण्यात आले आहेत.
दरम्यान, अनिल देशमुख चौकशीला कधी सामोरं जाणार, याकडे लक्ष लागलेलं असतानाच आता ईडीने अनिल देशमुखांविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केली आहे.
अनिल देशमुख यांच्या शोधासाठी ईडीने आत्तापर्यंत 12 ते 14 वेळा त्यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ईडीची तीन पथके एकाचवेळी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या शोधार्थ कार्यरत आहेत. आता लूकआऊटमुळे लवकरच परराज्यातदेखील ईडीकडून शोध सुरु असल्याचं जयश्री पाटील यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App