अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा, लाचखोर सब-इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना सात दिवसाची कोठडी द्यावी; सीबीआयची दिल्ली कोर्टात मागणी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लाचखोरी प्रकरणात अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआय सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी सीबीआयने आज दिल्ली कोर्टात केली आहे. corruption case relating to leaking some information of a separate case against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh

आनंद डागा आणि अभिषेक तिवारी यांनी कोर्टात जामीन अर्ज दाखल केला. त्यावर युक्तिवाद करताना सीबीआयने या दोघांची कोठडीची मुदत वाढवून पुढील सात दिवस कोठडीत ठेवून त्यांची चौकशी करून देण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली आहे.

शंभर कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे पवार सरकार से गृह मंत्री अनिल देशमुख हे कथितदृष्ट्या निर्दोष असल्याचा अहवाल सीबीआय इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांनी लाच घेऊन फोडला होता. त्यांना सीबीआयच्या पथकाने अटक केली.

अभिषेक तिवारीला अनिल देशमुख यांनी आपले वकील आनंद डागा यांच्यामार्फत लाच दिल्याचा आरोप आहे. या दोघांनाही सीबीआयच्या पथकाने मुंबईत अटक करून ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीत आणले. दिल्लीत कोर्टात त्यांना हजर केले. आता या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला त्यावर सीबीआयने युक्तिवाद करताना त्यांचा तपास आणि चौकशी सीबीआयच्या कोठडीत व्हावी आणि त्यासाठी सात दिवसांची मुदत मिळावी अशी मागणी कोर्टाला केली आहे.

corruption case relating to leaking some information of a separate case against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात