माजी गृहमंत्री देशमुख यांच्या निकटवर्तियांवर नागपुरात ईडीचे छापे, मुंबईत जयस्वाल नडण्याची चिन्हे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समोरील अडचणींमध्ये मंगळवारी (दि. 26) आणखी वाढ झाली. एकट्या मुंबईतून दरमहा शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट पोलिस यंत्रणेला दिल्याचा खळबळजनक आरोप देशमुख यांच्यावर झालेला आहे. ED raids on former Home Minister Anil Deshmukh’s close associates, New CBI chief Subodh Jaiswal may trouble in Mumbai


प्रतिनिधी

नागपूर : शंभर कोटी रुपये वसुलीच्या आरोपावरुन गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी (दि. 25) छापे टाकले. मुंबईहून आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी नागपूर कार्यालयाच्या मदतीने चार ठिकाणी ही कारवाई केल्याने देशमुख आणि त्यांच्या परिचितांपुढच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

नागपुरातील सुपारीचे व्यापारी सागर भटेवरा यांच्या हरेकृष्णा अपार्टमेंट, शिवाजीनगर येथील घरी छापा पडला. समित आयझॅक यांच्या सदर येथील न्यू कॉलनी बंगल्यावर छापा टाकण्यात आला. जाफरनगर येथील कादरी तसेच छिंदवाडा रस्त्यावरील प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊन्टंटचे कार्यालय आणि घरी ईडीने छापे टाकले. हे सगळे लोक देशमुख यांच्याशी संबंधित असल्याची चर्चा नागपुरात आहे.



मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांनी दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केल्यानंतर त्याची संपूर्ण देशात चर्चा झाली होती. एकट्या मुंबईतून महिन्याला शंभर कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती असे हिशोब केले जाऊ लागले. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिमा कमालीची डागाळल्यामुळे देशमुख यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेष्वण विभागाने (सीबीआय) 24 एप्रिलला देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांच्या नागपूर, पुणे आणि मुंबईतील निवासस्थाने व कार्यालयांवर छापे टाकले होते.

जयस्वाल यांची नियुक्ती ठाकरे-पवार सरकारला नडणारी

ठाकरे-पवार सरकारच्या कार्यशैलीमुळे सातत्याने सरकारसोबत ज्यांचे खटके उडत होते ते ज्येष्ठ अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल नुकतेच प्रतिनियुक्तीवर केंद्रात परतले होते. महाविकास आघाडीशी न पटलेल्या याच जयस्वाल यांची केंद्राने सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. जयस्वाल यांची नियुक्ती ठाकरे-पवार सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अडचणीत आणणारी आहे.

सन 1985 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या जयस्वाल यांनी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेत लक्षणीय कामगिरी केली आहे. सन 2014 मध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर फडणवीस यांनी गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवले. त्यानंतर फडणवीस यांनी जयस्वाल यांना पुन्हा राज्य पोलीस दलात परत आणले. जुलै 2018 मध्ये जयस्वाल यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली. राज्याचे तत्कालीन पोलिस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांच्या निवृत्तीनंतर सेवाज्येष्ठतेनुसार जयस्वाल यांना त्यांची जबाबदारी देण्यात आली.

मार्चमध्ये त्यांनी पोलिस महासंचालक पदाचा पदभार स्विकारला पण त्यानंतर काहीच महिन्यात ठाकरे-पवार सरकारसोबत त्यांचे खटके उडू लागले. त्यामुळे जयस्वाल यांनी केंद्रात परत जाण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्याकडे सीबीआयची धुरा आल्यामुळे अनिल देशमुख यांच्या कथित शंभर कोटी वसुली प्रकरणाच्या चौकशीही त्यांच्या अखत्यारीत आली आहे. जयस्वाल यांनी मुंबईत काम केले असल्याने देशमुख आणि पर्यायाने ठाकरे-पवार सरकारसाठी ही बाब अडचणीची ठरणार आहे.

ED raids on former Home Minister Anil Deshmukh’s close associates, New CBI chief Subodh Jaiswal may trouble in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात