कोव्हॅक्सिन टोचल्याने परदेश प्रवासावर गदा, पण ही आहे गुड न्यूज

जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) मान्यता नसल्याचे कारण देत जगातल्या अनेक देशांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला वैधता देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ज्या भारतीयांनी कोव्हॅक्सिन घेतली आहे त्या नागरिकांना जगातल्या अनेक देेशांनी व्हिसा नाकारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकने मोठा खुलासा केला आहे. लाखो भारतीयांसाठी ही गुड न्यूज असेल. Bharat Biotech confident to get WHO Nod To Covaxin In July-Sept : The WHO has Pfizer, Moderna and Covishield on its list but for Covaxin, it says “more information required”


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस टोचून घेतली. कोरोना निर्मूलनासाठी जगभर झालेल्या संशोधनात भारतीय वैज्ञानिकांनीही कमाल करत अवघ्या वर्षभरात कोविड-19 वर परिणामकारक लस शोधली. मात्र काही पाश्चिमात्य देशांनी तीव्र व्यावसायिक स्पर्धा आणि आकसापोटी या स्वदेशी भारतीय लसीला अद्याप मान्यता देण्याचे नाकारले आहे. यासाठी डब्ल्यूएचओचे कारण दिले जात आहे. मात्र येत्या सप्टेंबरपर्यंत भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनवर डब्ल्यूएचओच्याही वैधतेची मोहोर उमटण्याची चिन्हे आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जगातल्या बहुतेक देशांनी हवाई प्रवास, पर्यटनाला चालना देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र परदेशातून येणाऱ्या नागरिकांना लसीकरण अनिवार्य केले आहे. डब्ल्यूएचओने वैध ठरवलेल्या लसींव्यतिरीक्त लसीकरण करुन घेतले असेल तर संबंधिताला व्हिसा नाकारला जात आहे. किंवा देशात प्रवेश दिल्यानंतर त्यांना चौदा दिवसांसाठी क्वारंटाईन केले जात आहे. याचा फटका प्रामुख्याने भारतातील कोव्हॅक्सिन घेतलेल्या उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी आणि पर्यटकांना बसतो आहे. मात्र ही त्रुटी देखील लवकरच दूर होणार आहे.



अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आर्यलंड आणि युरोपातील बहुसंख्य देशांनी कोव्हॅक्सिनला त्यांच्या पात्र लसींच्या यादीत सध्या तरी स्थान दिलेले नाही. या देशांमधली विद्यापीठे डब्ल्यूएचोने वैध ठरवलेल्या लसी टोचलेल्या विद्यार्थ्यांनाच थेट प्रवेश देत आहेत. लिमरिक युनिव्हर्सिटीच्या प्रादेशिक सल्लागार सौम्या पांडे यांनी सांगितले, “कोव्हॅक्सिन ही पात्र लसींच्या यादीत नाही. याचा अर्थ असा की अनेक विद्यार्थ्यांसाठी हॉटेलांमधला क्वारंटाईन कालावधी अनिवार्य आहे. चौदा दिवस हॉटेलांमध्ये राहणे हे अनेक देशांमध्ये प्रचंड खर्चिक आहे.”

डब्ल्यूएचओने तूर्तास फायझर, मॉडर्ना आणि कोव्हिशिल्ड या तीनच लसींना मान्यता दिली आहे. कोव्हॅक्सिनच्या बाबतीत आणखी माहितीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिका, ब्राझील आणि हंगेरी सह जगातल्या साठ देशांमध्ये कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यासाठीची प्रक्रिया संबंधित देशांमधल्या नियामक प्राधिकाऱ्यांमार्फत चालू करण्यात आली आहे. आपत्कालीन वापरासाठीचे अधिकृतता तेरा देशांमध्ये मिळाली असून आणखी काही देशांमध्ये लवकरच मिळेल. डब्ल्यूएचओच्या जिनिव्हा येथील नियामक प्राधिकरणाकडे वैधतेसाठीची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. येत्या जुलै-सप्टेंबरपर्यंत डब्ल्यूएचओची मंजुरी कोव्हॅक्सिनला मिळणे अपेक्षित आहे.

Bharat Biotech confident to get WHO Nod To Covaxin In July-Sept : The WHO has Pfizer, Moderna and Covishield on its list but for Covaxin, it says “more information required”

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात