प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांनी जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ईडीच्या कायदेशीर कारवायांबाबत तक्रारी केल्या असल्या तरी ईडीच्या कायदेशीर कारवाई थांबणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.सध्या महाविकास आघाडीचे नेते, मंत्री यांच्यामागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत यांचे राहते घर आणि अलिबाग येथील 8 भूखंड ईडीने ताब्यात घेतल्यावर ईडीच्या रडारवर आता महाविकास आघाडीचा आणखी एक नेता आला आहे. यासाठी ईडी कोकणात पोहचली आहे.ED Inquiry: Konkan Refinery Project on ED’s Radar; 200 acre land transaction investigation
ईडीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना सळोपळो करुन सोडले आहे. आता ईडीची नजर कोकणातील जमीन खरेदी व्यवहाराकडे वळवली आहे. सध्या कोकणातील रिफायनरी प्रकल्प चर्चेत आहे. आणि याच प्रकल्प परिसरात मागील दोन ते चार वर्षांत झालेल्या जमीन खरेदीचा व्यवहार ईडीने तपासला आहे.
मार्चमध्ये महाविकास आघाडीतील एका बड्या नेत्याच्या भावाची आणि नातेवाईकांची ईडीने चौकशी केल्याची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीने दिली आहे. 200 एकर जागा खरेदीबाबत चौकशी झाल्याचे समजते. 8 आणि 9 मार्च रोजी राजापूर शहरातील एका हॉटेलमध्ये पहाटे पाच वाजता ही चौकशी झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा, राजापूर तालुक्यातील पश्चिम भाग, कोंड्ये गावातील जमीन व्यवहारांची चौकशी झाली.
पवारांची मोदींकडे तक्रार
महाविकास आघाडीतील अनेक नेते आतापर्यंत ईडीच्या चौकशीत अडकले आहेत. एकमागोमाग एक नेत्यांच्या या चौकशीवरुन महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा आरोप वारंवार महाविकास आघाडीकडून केला जात आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यावेळी पवार यांनी ईडीच्या कारवायांबाबत माहिती दिली. पण ईडीची कायदेशीर कारवाई थांबण्याचे नाव घेत नाहीये.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App