बालगुन्हेगाराचा सुधारगृहाच्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला


पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळा अंर्तगत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या एका सुरक्षारक्षकावर सुधारगृहा बाहेर आलेल्या बालगुन्हेगाराने कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे -पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळा अंर्तग सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या एका सुरक्षारक्षकावर सुधारगृहा बाहेर आलेल्या बालगुन्हेगाराने कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत सुरक्षारक्षक राजेंद्र विठ्ठल देडे (वय-५१,रा.चिखली, पुणे) हे गंभीर जखमी झाले आहे. Juvenile accused attempt murder of Juvenile Correctional Institution security guard

याप्रकरणी त्यांनी येरवडा पाेलीस ठाण्यात अल्पवयीन आराेपी विराेधात तक्रार दिली आहे. राजेंद्र देडे हे बालन्यायमंडळ, येरवडा याठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करत असून ते पूर्वी येरवडा येथील बालसुधारगृहात सुरक्षारक्षक म्हणून काम करत हाेते. चार एप्रिल राेजी रात्री दहा वाजण्याचे सुमारास येरवडा परिसरातील गुंजन चाैकात सरगम हाॅटेलजवळ ते उभे असताना, सध्या बालसुधारगृहा बाहेर असलेला व त्यांच्या ताेंड ओळखीचा अल्पवयीन मुलगा त्यांच्या जवळ आला.

‘मी बालसुधारगृहात असताना तुला लई माज आला हाेता का, आज तुला दाखवताेच तुझा खेळच खल्लास करताे असे म्हणून त्याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने राजेंद्र देडे यांच्या डाेक्यात जीवे ठार मारण्यासाठी वार केला. देडे यांनी सदर वार चुकवला असता ताे वार त्यांच्या उजव्या हाताने अडविल्याने उजव्या हाताचे पंजाजवळ, मनगटावर गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी येरवडा पाेलीस पुढील तपास करत आहे.

Juvenile accused attempt murder of Juvenile Correctional Institution security guard

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात