ED Arrested Girish Chaudhari : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंतर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली. ईडी लावली तर मी सिडी लावेन असा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना हा सर्वात मोठा धक्का आहे. भोसरी भूखंडप्रकरणी एकनाथ खडसेंची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती. ED Arrested Girish Chaudhari Son in Law Of Eknath Khadse in Pune Bhosari Land Scam
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंतर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली. ईडी लावली तर मी सिडी लावेन असा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना हा सर्वात मोठा धक्का आहे. भोसरी भूखंडप्रकरणी एकनाथ खडसेंची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती.
NCP leader Eknath Khadse's son-in-law was arrested in the Pune land deal case yesterday. He was called for questioning and later placed under arrest: Enforcement Directorate — ANI (@ANI) July 7, 2021
NCP leader Eknath Khadse's son-in-law was arrested in the Pune land deal case yesterday. He was called for questioning and later placed under arrest: Enforcement Directorate
— ANI (@ANI) July 7, 2021
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ताकाळात एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खाते होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
भाजपला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन असा इशारा दिला होता. एकनाथ खडसेंच्या जावयांना आता ईडीकडून अटक झाल्यानंतर ते काय पवित्रा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी, खडसेंनी दावा केला होता की, एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूलमंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझ्या बायको आणि जावयाने काय व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला, असे होते का? त्यांच्या त्या स्वतंत्र आहेत. तशी माझी बायको स्वतंत्र आहे, माझा जावई एनआरआय आहे, त्यालाही अधिकार आहेत.
ED Arrested Girish Chaudhari Son in Law Of Eknath Khadse in Pune Bhosari Land Scam
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App