मलिक किंवा त्यांच्यावतीने वकील हजर नसल्याने पुढील सुनावणी १ जानेवारी २०२२ रोजी ठेवण्यात आली.वाशिम जिल्हा न्यायालयाने मलिक यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. DRUGS CASE: Nawab Malik absent from court; The next hearing is on January 1
विशेष प्रतिनिधी
वाशिम : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकामागोमाग एक आरोप केले.गेल्या दीड-दोन महिन्यांपासून नवा मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वाद काही थांबायला तयार नाही.
दरम्यान ‘एनसीबी’चे समीर वानखडे यांचे चुलतभाऊ संजय वानखडे यांनी जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध वाशिम सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर काल (सोमवारी १३ डिसेंबर ) रोजी सुनावणी झाली.
यावेळी मलिक किंवा त्यांच्यावतीने वकील हजर नसल्याने पुढील सुनावणी १ जानेवारी २०२२ रोजी ठेवण्यात आली.वाशिम जिल्हा न्यायालयाने मलिक यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाचा आदेश घेऊन कुर्ला पोलीस स्टेशनचे कर्मचारी तीन दिवस मलिक यांच्या बंगल्यावर गेले असता ते नसल्याचे सांगण्यात आले.
मलिक यांनी समीर वानखडे यांच्याविरुद्ध जातीवाचक वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत संजय वानखडे यांनी ॲड. उदय देशमुख यांच्यामार्फत वाशिम न्यायालयात याचिका दाखल केली. यावर काल (१३ डिसेंबरला ) सुनावणी होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App