वृत्तसंस्था
मुंबई : शिवाजी पार्कला स्मशानभूमी बनवू नका,असे स्पष्ट मत भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. Don’t make Shivaji Park a cemetery; Prakash Ambedkar’s clear opinion; Dispute over Lata Mangeshkar’s memorial
शिवाजी पार्क येथील लता मंगेशकर यांच्या स्मारकाच्या वादावर ते बोलत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले होते व तेथेच त्यांचे स्मारक उभारण्यात आले. त्याच प्रमाणे लतादीदींचे स्मारक उभारावे, अशी मागणी होत आहे. ती त्यांना अमान्य आहे.
लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार केल्यावर याच ठिकाणी त्यांचे स्मारक करण्याची मागणी पुढे येऊ लागली. त्यावरून वादही निर्माण झाला. भाजपा व काँग्रेसने या मागणीला पाठिंबा दिला असताना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठीच असावे, अशी भूमिका मांडली आहे.
आपला या मागणीला विरोध असल्याचं रोकठोक मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मुंबईत आधीच मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध नाहीत, अशा वेळी शिवाजी पार्क मैदानात स्मारक उभारणे चुकीेचे ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केलंय.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App