लता मंगेशकर अंत्यसंस्काराला काँग्रेस नेत्यांची अनुपस्थिती, स्पष्टीकरण देता देता नाना पटोले यांनी दमछाक


ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कार बहुतांश काँग्रेस नेत्यांची अनुपस्थिती होती. त्यावर स्पष्टीकरण देता देता काँग्रेस प्रदेाध्यक्ष नाना पटोले यांची दमछाक झाली. मुंबईचे पालकमंत्री असलम शेख हे सुद्धा अंत्यसंस्कारासाठी उपस्थित नव्हते. यामुळे काँग्रेसवर टीका होत आहे.Absence of Congress leaders at Lata Mangashkar’s funeral, Nana Patole giving explanation


विशेष प्रतिनिधी

मुंबई – ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कार बहुतांश काँग्रेस नेत्यांची अनुपस्थिती होती. त्यावर स्पष्टीकरण देता देता काँग्रेस प्रदेाध्यक्ष नाना पटोले यांची दमछाक झाली. मुंबईचे पालकमंत्री असलम शेख हे सुद्धा अंत्यसंस्कारासाठी उपस्थित नव्हते. यामुळे काँग्रेसवर टीका होत आहे.

पटोले म्हणाले, शेख सुद्धा मुंबईबाहेर होते.वर्षा गायकवाड मुंबईबाहेर होत्या शनिवार रविवार मुळे अनेकांची दौरे होते.बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण कोरोना बाधित आहेत त्यामुळे ते लता दिदींच्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत. माझ्या बहिणीच्या सासु सुद्धा वारल्यामुळे मी तिकडे होतो. आमचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप तिथे होते

महाराष्ट्रात सर्व तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या लोकांना आम्ही सूचना दिल्यात. सर्व ठिकाणी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अनेकांना कनेक्टिव्हिटी नव्हती त्यामुळे आम्ही पोहोचू शकलो नाहीलतादीदी या काँग्रेस परिवारातल्याच होत्या त्यांचे योगदान एवढे मोठे आहे.
लतादीदी यांचे स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावं आणि चांगल्या दर्जाचं व्हावं, आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावं.देशातून आणि जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला गेल्यानंतर लतादीदींचा गोड आवाज कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीला स्मरणात राहील अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्क मध्ये व्हावं हे काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

अभिनेता शाहरुख खान प्रकरणावर पटोले म्हणाले, प्रत्येकाला संविधानाप्रमाणे स्वतंत्र आहे की आपल्या धर्मानुसार वागावे. काहीजण मुद्दामून धर्मावर टीका करून मोठे करण्याचे काम करत आहे. काही जणांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे की दुसऱ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालायचा.

लतादीदी यांनी पेडर रोडच्या उड्डाणपुलाचा जेंव्हा विषय आला होता तेव्हा त्यांनी मला डिस्टर्ब होईल म्हणून सांगितले. त्यावेळी आघाडीचे सरकार होतो आणि तेव्हा आम्ही निर्णय घेतला आणि उड्डाणपूल पेडर रोडला झाला नाही असेही पटोले म्हणाले.
ओबीसी आरक्षणावर पटोले म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे निर्देश पूर्ण तयारी झाली आहे. त्या पद्धतीचा आयोगाचा रिपोर्ट तयार केला आहे

मुंबई महापालिका निवडणुकीबाबत काँग्रेसची भूमिका सांगताना पटोले म्हणाले, निवडणूक समोर येईल तेंव्हा जी परिस्थिती असेल त्यानुसार निर्णय घेऊ. किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत पटोले म्हणाले, लोकांना जर या निर्णयाविरोधात राग आहे तर जनतेच्या हिताचा निर्णय घेतला गेला पाहिजे. शरद पवार यांचे यासंदर्भात वक्तव्य आले तेव्हा आम्ही सुद्धा सांगितले की कॅबिनेटला अधिकार आहे.

Absence of Congress leaders at Lata Mangashkar’s funeral, Nana Patole giving explanation

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात