अमरावतीमध्ये हिंसा घडली असल्यामुळे कलम १४४ नुसार संचारबंदी लागू केली आहे.अमरावती गेल्या काही दिवसांपासून हिंसाचारमुळे तणावपूर्ण वातावरणात आहे.Do you want to come to Amravati and provoke the atmosphere here again? Question from Yashomati Thakur
विशेष प्रतिनिधी
अमरावती:त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चात मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली.दरम्यान अमरावतीमध्ये हिंसा घडली असल्यामुळे कलम १४४ नुसार संचारबंदी लागू केली आहे.अमरावती गेल्या काही दिवसांपासून हिंसाचारमुळे तणावपूर्ण वातावरणात आहे.
दरम्यान भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, पोलिसांकडून सोमय्या यांना अमरावती दौरा रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. परिस्थिति नियंत्रणात असली तरी अजूनही संचारबंदी कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे.
पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, किरीट सोमय्या यांनी अजून १५ दिवस तरी अमरावतीत येऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच अमरावतीत येऊन त्यांना काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. त्यामुळे आता किरीट सोमय्या आपला दौरा रद्द करतील का याकडे सर्वांचे लक्ष होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App