एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ; सरकारने दिली ‘ ही ‘ भेट

दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2 हजार 500 रूपये देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.Diwali for ST employees will be sweet; ‘This’ gift given by the government


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सणासुदीच्या काळात नेहमीच शासकीय कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून बोनस, महागाई भत्ता दिला जात असतो. आता एसटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळीच्या मुहूर्तावर दिलासा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

दिवाळीची भेट म्हणून एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्यांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2 हजार 500 रूपये देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 17 टक्के होणार असल्याचं परब यांनी यावेळी सांगितलं आहे.



राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुमारे 93 हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला होणारा पगार यंदा नोव्हेंबरच्या 1 तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे.

एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सकारात्मक सहकार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे अनिल परब यांनी आभार मानले.

Diwali for ST employees will be sweet; ‘This’ gift given by the government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात