प्रतिनिधी
मुंबई : दिशा सालियन प्रकरणात तिची बदनामी केल्याच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना दिंडोशी कोर्टाने काही अटी – शर्तींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस यु बघेले यांनी राणेंच्या अर्जावर निर्णय दिला आहे. Disha Salian Difemation Case : narayan rane and nitesh rane got anticipatory bail
दिशा सालीयन बाबत कथित स्वरूपात आक्षेपार्य वक्तव्य केल्या प्रकरणी दिशाच्या आईने नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तर राणे पिता पुत्रांनी दिशाची बदनामी केली असा आक्षेप घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगात धाव घेतली होती.
त्यानंतर महिला आयोगाच्या निर्देशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. परंतू राणे यांनीही दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला. त्याप्रकरणी आज सुनावणी झाली. राणे पिता – पुत्रांना या प्रकरणी कोर्टाने दिलासा दिला आहे. कोर्टाने काही अटी शर्तींसह दोघांचा जामीन मंजूर केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App