महाविकास आघाडीत नाना नाराज; काँग्रेस + ठाकरे + पवारांच्या बैठकीत मुख्यमंत्री पद शेअरिंग वर चर्चा??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील परफॉर्मन्स नंतर अप बीट मूडमध्ये मध्ये असलेल्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नेते नाना पटोले नाराज झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये ठाकरे + पवारांनी बोलावलेले बैठकीला नाना पटोले जाणार नसून त्यांच्या ऐवजी पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना पाठविले जाणार असल्याची बातमी आहे. नाना पटोले यांच्याबरोबरच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना देखील बैठकीचा अजेंडा माहिती नसल्याची बातमी आहे. या बैठकीनंतर महाविकास आघाडीचे नेते एकत्रित पत्रकार परिषदेला सामोरे जाणार आहेत. Discussion on Chief Minister post sharing in the meeting

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीवर मात केल्यानंतर महाविकास आघाडीचे सगळेच घटक पक्ष प्रचंड उत्साहात आले. काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रातल्या 288 जागा लढवण्याची तयारी सुरू केली. ही तयारी फक्त संघटनात्मक पातळीवर न ठेवता या पक्षाच्या नेत्यांनी ती जाहीर बोलून दाखवली. काँग्रेसमध्ये तर नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून नाव घेतले जाऊ लागले. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त जागा मिळाल्याने तो सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. अर्थातच महाविकास आघाडी तो मोठा भाऊ झाल्याची टिप्पणी नाना पटोले यांनी केली. त्यावरून त्यांचा आणि संजय राऊत यांचा वादही झाला.

परंतु उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाविकास आघाडीत समन्वय राखण्याच्या दृष्टीने आज यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बैठक बोलावली. सुरुवातीला या बैठकीला नाना पटोले जाणार होते. परंतु त्यांचा अचानक इतरत्र दौरा निघाल्याने त्या बैठकीला जाणार नसल्याची बातमी आली. विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना देखील बैठकीचा नेमका अजेंडा माहिती नसल्याची बातमी समोर आली.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या बैठकीला पाठवण्याचे ठरविले. यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बैठक झाल्यानंतर हे सगळे नेते एकत्रित रित्या पत्रकार परिषदेला सामोरे जाऊन काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे. यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारापासून ते जागा वाटपापर्यंत तसेच आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पद शेअर करून घेण्यापर्यंत अनेक बाबींचा समावेश असण्याची शक्यता आहे.

Discussion on Chief Minister post sharing in the meeting

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात