छत्रपती शिवाज महाराजांची युद्धनीती, महाराजांचे प्रशासक म्हणून असलेले कार्य, महाराजांनी राबवलेली कल्याणकारी योजना आणि महाराजांची अर्थनीती याचे धडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमातून मिळणार आहे. विद्यार्थी म्हणून या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायला नक्की आवडेल, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.Diploma course on Chhatrapati Shivaji, MP Amol Kolhe says he would love to be a student again
विशेष प्रतिनिधी
पुणे : छत्रपती शिवाज महाराजांची युद्धनीती, महाराजांचे प्रशासक म्हणून असलेले कार्य, महाराजांनी राबवलेली कल्याणकारी योजना आणि महाराजांची अर्थनीती याचे धडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमातून मिळणार आहे. विद्यार्थी म्हणून या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायला नक्की आवडेल, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज ही डोक्यावर घेण्याऐवढीच डोक्यात साठवून जीवनात अंमलात आणण्याची बाब आहे. चिकित्सकपणे अंगी बाणविण्याचे असीम चैतन्य आहे, अशी माझी धारणा आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाच्या वतीने उत्रपती शिवरायांच्या युध्दनितीवर एक वर्षाचा डिप्लोमा सुरू होत आहे. या उपक्रमाला मन:पूर्वक शुभेच्छा. विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामाजिक शास्त्र विभागातर्फे हा एक वषार्चा कोर्स सुरू करण्यात येत आहे.
या अभ्यासक्रमासाठीची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज : व्हिजन एँड नेशन बिल्डिंग’ असे आहे.महाराजांची 50 वर्षांची कारकिर्द विविध घटनांनी भरलेली आहे. याचा आढावा अनेक पुस्तकांतून मांडला आहे.
यामध्ये महाराजांची युद्धनीती, महाराजांचे प्रशासक म्हणून असलेले कार्य, महाराजांनी राबवलेली कल्याणकारी योजना आणि महाराजांची अर्थनीती याचे धडे दिले जाणार आहे. या सगळ्याचे बारकावे अभ्यासक्रमात आहेत. हा अभ्यासक्रम दोन सहामाही सत्रांमध्ये विभागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App