विशेष प्रतिनिधी
मुंबई : Dhananjay Munde काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जनतेची मते चोरण्याचे काम निवडणूक आयोग करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पराभव मोठ्या मनाने मान्य करावा लागतो. आम्ही लोकसभा निवडणुकीवेळी मान्य केला होता, असे मुंडे म्हणाले. जनतेने आम्हाला दिलेला यश हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठ्या मनाने कबूल करावे, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी नाना पटोले यांना लगावला.Dhananjay Munde
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. त्यांना 50 चा आकडाही गाठता आला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले. नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला सवाल मतदानाच्या टक्केवारीत झालेल्या तफावतबाबत उत्तर मागितले. यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते शिर्डी येथे माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
धनंजय मुंडे म्हणाले, तुम्ही लोकसभेत जिंकता तेव्हा तुम्हाला जनतेने जिंकवले. आता तुम्ही विधानसभेत हरता तेव्हा तुमची ही हार ईव्हीएममुळे झाली, अशा पद्धतीचा सुरू असलेला भाबडेपणा महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकला आहे. ईव्हीएमबाबत मतदान कसे झाले? उशिरा का झाले? याबाबत बोलण्यात काहीही अर्थ नाही. पराभव मोठ्या मनाने मान्य करावा लागतो. आम्ही देखील लोकसभा निवडणुकीतील पराभव मान्य केला होता. तेव्हा आम्ही ईव्हीएम वगैरे बोललो नाही, असे ते म्हणाले.
आमचे यश मोठ्या मनाने कबूल करावे
जनतेने आम्हाला दिलेला यश हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठ्या मनाने कबूल करावे, असा टोला धनंजय मुंडे यांनी नाना पटोले यांना लगावला. मंत्रीपदाबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय एकत्रित बसून घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस नेत्यांनी एकदा आपली अवस्था बघावी
धनंजय मुंडे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावरही टीका केली. काँग्रेसचे नेते जे म्हणतायत किंवा आरोप करताय त्यांची काय अवस्था झाली हे त्यांनी एकदा बघावे. ते कोठे होते आणि आता कुठे आले आहेत. त्यांनी जी काही आहे, तेवढी पण ठेवली नाही. जेवढी लाज राहिली आहे तेवढी तरी त्यांनी राखावी. 2029 चे सांगण्यापेक्षा आज महाराष्ट्रातील मायबाप जनतेने तुम्हाला जो धडा शिकवला, त्याबद्दल बोला ना? अशी टीका त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App