संरक्षण उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर – देवेंद्र फडणवीस

…त्यामुळे महाराष्ट्र संरक्षण उत्पादनाचे नवीन धोरण तयार करणार आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.


विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्रामध्ये संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी पुणे येथे आयोजित महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनीताई जगताप , आमदार महेश शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.Devendra Fadnavis is the leader in defense manufacturing sector in Maharashtra

यावेळी लहान शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन व महाराष्ट्र शासन, -फायर डिफेन्स आयटम्स मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी एसबीएल एनर्जी लिमिटेड व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये आणि ॲमिनिशन एक्सपोच्या निर्मितीमध्ये सहकार्य करण्यासाठी निबे लिमिटेड व म्युनिशन्स इंडिया लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले. हे करार महाराष्ट्राच्या संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी येत्या काळात महत्वपूर्ण ठरणार आहेत.



याप्रसंगी फडणवीस म्हणाले, ‘पुणे हे भारताच्या सामरिक सामर्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर असून येथे संरक्षण उत्पादनाची एक इकोसिस्टम निर्माण झाली आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. देशाच्या हवाई दलाची देखभाल कमांड, लष्कराची दक्षिण कमांड, नौदलाचे मुंबई डॉकयार्ड महाराष्ट्रात आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिकल्स नाशिकमध्ये ‘तेजस’ आणि ‘सुखोई’ सारखी लढाऊ विमाने बनवते, माझगाव डॉकमध्ये जहाज बांधणीची आधुनिक यंत्रणा आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स सारख्या संरक्षण क्षेत्रात काम करणारी उच्च तंत्रज्ञान यंत्रणा तसेच संरक्षण क्षेत्रात काम करणार्‍या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत.’

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची ताकद ओळखली. आधी आपला देश शस्त्रास्त्रासाठी परदेशावर अवलंबून होता. आज आपला देश स्वतःचे संरक्षण साहित्य तयार करतो आहे. आता विमाने आणि युद्धनौकांसाठी लागणारा 30 टक्के दारूगोळा भारतात तयार होतो.’ अशी माहितीही दिली.

तसेच ‘महाराष्ट्राने 2017 मध्ये एरोस्पेस आणि संरक्षण धोरण तयार केले आणि 1,000 कोटींचा निधी तयार केला. त्यातून 600 एमएसएमई निर्माण झाले आहेत. या औद्योगिक संघटनांनी केवळ 300 कोटींमधून सुमारे 15,000 कोटींची उलाढाल केली. जगातील सर्व देश भारतासोबत संरक्षण क्षेत्रात काम करण्यास तयार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र संरक्षण उत्पादनाचे नवीन धोरण तयार करणार आहे.’ असं फडणवीसांनी सांगितलं.

या प्रदर्शनासाठी त्यांची शस्त्रे आणि उपकरणे पाठवल्याबद्दल तीनही सैन्यदलांचे प्रमुख आणि संरक्षण उद्योगाचे अभिनंदन आणि आभार ! संरक्षण उत्पादन ही इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी आहे, म्हणून या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण या इकोसिस्टीमचा भाग कसे बनू शकतो याचा विचार देखील विद्यार्थ्यांनी नक्कीच करावा! असे आवाहनही यावेळी फडणवीसांनी केले.

Devendra Fadnavis is the leader in defense manufacturing sector in Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात