एक “तुतारी” द्या मज आणून, फुंकीन “पुंगी” स्व प्राणाने!!; तुतारी चिन्हाची सोशल मीडियावर खिल्ली!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला “तुतारी वाजवणारा माणूस” हे चिन्ह बहाल केल्यानंतर पवारांच्या पक्षात जरी प्रचंड उत्साह संचारला असला, तरी सोशल मीडियावर मात्र त्या तुतारी चिन्हाची जोरदार खिल्ली उडवली जाऊ लागली आहे.Many political leaders making fun of Sharad pawar’s NCP’s election symbol Trumpet

शरद पवारांनी काल तब्बल 40 वर्षांनी रायगडावर जाऊन त्यांच्या समर्थकांच्या प्रचंड उत्साहात पक्षाच्या तुतारी चिन्हाचे अनावरण केले. त्याआधी जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजवून दाखवावी, असे आव्हान अजित पवारांचे समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनी दिले होते. आव्हाड जर तुतारीचा आवाज काढू शकले तर त्यांना 1 लाख रुपये देऊ, असे ते म्हणाले होते. त्यानुसार जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजवली अमोल मिटकरी यांनी 1 लाख रुपयांचा चेक लिहिला, पण त्यामध्ये त्यांनी काही चूक केली.त्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या, पण त्यानंतर अमोल मिटकरी यांनी एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केला त्यामध्ये त्यांनी ही तुतारी वाजली की पुंगी असा सवाल केला. यात जितेंद्र आव्हाड तुतारी वाजवताना दिसत आहेत, परंतु प्रत्यक्षात आवाज मात्र पुंगीचा येतो आहे, असा अमोल मिटकरी यांनी दावा केला.

अमोल मिटकरी यांच्या खेरीज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री गिरीश महाजन आदी नेत्यांनी वेगवेगळ्या शब्दांमध्ये तुतारी चिन्हाची खिल्ली उडवून पवारांच्या पक्षाला त्यातून फारसे यश मिळणार नाही, असा दावा केला. सोशल मीडियावर तुतारी चिन्हाबद्दल सर्वाधिक चर्चा सुरू आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांचा तुतारी वाजवतानाचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर केला. आव्हाड यांचा तुतारी वाजवण्याचा प्रयत्न बरा असला तरी मिटकरी यांनी त्यावरून आव्हाडांना चिमटा काढला. मिटकरी यांनी हा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत म्हटलं आहे की, “ही तुतारी आहे की पुंगी? आमच्याकडे उन्हाळ्यात कुल्फी विकणारे असंच वाजवतात.” यासह ‘कुल्फीवाले’ असा हॅशटॅगही मिटकरी यांनी दिला आहे. त्याचबरोबर “आली बेकारी, वाजवा तुतारी”, असं लिहून मिटकरी यांनी अवाहाडांना चिमटा काढला.

अमोल मिटकरी म्हणाले, कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हाचे लोकार्पण रायगडावर होणे, चुकीची बाब आहे. या सोहळ्यावर शरद पवार गटातील सर्वच नेते समाधानी असतील, तर आमदार रोहित पवार आणि आमदार राजेश टोपे हे त्या ठिकाणी अनुपस्थित का राहिले?? याचा अर्थ तुतारीचा निर्णय इतर लोकांना पटलेला दिसत नाही. रायगडाच्या मातीत अशाप्रकारे राजकीय कार्यक्रम होणं अत्यंत चुकीचे आहे.

Many political leaders making fun of Sharad pawar’s NCP’s election symbol Trumpet

 

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात