विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक बहुतांश विद्यामान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली गेली आहे. तर काही नवीन चेहऱ्यांचाही समावेश आहे. भाजपची पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आदी दिग्ग्ज नेत्यांचा समावेश आहे.
या यादीवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टीने मला विधानसभा निवडणुकीसाठी सहाव्यांदा संधी दिली. भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह आणि मा. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डाजी तसेच केंद्रीय निवडणूक समितीतील सर्व सन्माननीय नेत्यांचा मी नितांत आभारी आहे.’
Chandrachud : सरन्यायाधीश म्हणाले- ज्युनियरसोबतही विनम्रपणे वागा; मी सर्वोच्च न्यायालयाला लोक न्यायालय बनवण्याचा प्रयत्न केला
तसेच ‘पक्षनेतृत्त्व, माझ्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील नागरिक आणि माझ्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेने सातत्याने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचाच माझा प्रयत्न असेल.’ असंही फडणवीसांनीम म्हटलं आहे.
याशिवाय, ‘भाजपाच्या पहिल्या यादीत माझ्याव्यतिरिक्त आणखी 98 उमेदवार जाहीर झाले आहेत, त्यात आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह या उमेदवार यादीतील सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा!’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App