विशेष प्रतिनिधी
मुंबई : निर्भया पथकाच्या गाड्या सुप्रिया सुळेंनी स्वतःच्या सुरक्षेसाठी लावल्या असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
निर्भया पथकाच्या गाड्या वापरताना महिला सुरक्षा का नाही आठवली? असा सवाल करत सुप्रिया सुळे यांचा दुतोंडीपणा उघड केला आहे.
बदलापूर घटनेवर सुप्रिया सुळे यांनी माझी सुरक्षा काढून मुलींना सुरक्षा द्यावी अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘माझा त्यांना सवाल आहे, मागच्या काळात यांचे सरकार असताना निर्भया पथकाच्या गाड्या यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरल्या. यावेळेस त्यांना महिलांची सुरक्षितता आठवली नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत.
Ramdas Athawale : ‘बदलापूरची घटना मानवतेसाठी लज्जास्पद असून आरोपींना…’ ; रामदास आठवले
याबाबतची माहिती अशी की, महाविकास आघाडी सरकारने निर्भया पथकासाठी एकूण २२० वाहने खरेदी केली होती. मात्र ती वाहने त्यासाठी न वापरता त्यातील १२१ वाहने मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यांना देण्यात आली. तर ९९ वाहने इतर विभागांसाठी देण्यात आली. निर्भया निधीतून खरेदी केलेली ही ९९ वाहने जलद प्रतिसाद, लाचलुचत विभाग, मोटार विभाग आणि मंत्र्यांच्या ताफ्यांसाठी देण्यात आली.
धक्कादायक म्हणजे आदित्य ठाकरे यांच्याही ताफ्यात एकूण १७ गाड्या देण्यात आल्या.९९ पैकी ९ वाहने ही तत्कालीन मंत्र्यांच्या दावणीला होती. १२ वाहने व्हीव्हीआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी होती. त्यात सुभाष देसाई, विजय वड्डेटीवार, सुनील केदार यांच्यासह सुप्रिया सुळेंच्या ताफ्यात देखील निर्भया पथकांची गाडी होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App