Devendra Fadnavis : मुंबईत आज भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. अमरावती, नांदेड, मालेगावातील हिंसाचार, सामूहिक बलात्काराच्या वाढलेल्या घटना, हत्या, वसुली आणि भ्रष्टाचाराचे आरोप यावरून फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. Devendra Fadnavis criticizes Thackeray government Over Amravati riots, gang rape and murder in State
प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत आज भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. अमरावती, नांदेड, मालेगावातील हिंसाचार, सामूहिक बलात्काराच्या वाढलेल्या घटना, हत्या, वसुली आणि भ्रष्टाचाराचे आरोप यावरून फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
फडणवीस म्हणाले की, आज सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत. राज्यात आज राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध ठेवले जात आहेत. आज जिल्ह्या जिल्ह्यात मंत्री, आमदार, खासदारांचं अवैध रेती, अवैध दारूचं नेक्सस सुरु आहे. महाराष्ट्रात यापूर्वी अशी अवस्था कधीही पाहिली नव्हती. या सरकारमध्ये कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे’चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणीही पाहायला तयार नाही. एका मुलीवर 400 लोक बलात्कार करतात, काय चालले आहे महाराष्ट्रात? सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करु. पण सरकारमध्ये केवळ ‘भक्ती’ उपक्रम चालू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
एका मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात, काय चालले आहे महाराष्ट्रात?सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करू. पण सरकारमध्ये केवळ ‘भक्ती‘ उपक्रम चालू आहे: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis — @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 16, 2021
एका मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात, काय चालले आहे महाराष्ट्रात?सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करू. पण सरकारमध्ये केवळ ‘भक्ती‘ उपक्रम चालू आहे: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 16, 2021
यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणी पाहायला तयार नाही. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध आणि अवैध रेती, अवैध दारू आणि सट्टा गावोगावी. महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच झाली नव्हती. आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामी नाही, त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही. अमरावतीत जे घडले ती कोणती घटना नाही तर एक प्रयोग आहे. सावध व्हा.
फडणवीसांनी राज्यातील हिंसाचारावर बोट ठेवत राज्य सरकारवर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, 26 ऑक्टोबरला बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात त्रिपुरात रॅली निघाली. 28 ऑक्टोबरला फेक न्यूज फॅक्टरीचे काम सुरू झाले, त्रिपुरा पोलिसांनी हे कारस्थान उघड केले आहे. 8 नोव्हेंबरला राहुल गांधींचे ट्विट येते आणि मग प्रयोग सुरू होतो. हा हिंसाचार सरकार समर्थित असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, अमरावतीत SRP च्या 7 तुकड्या होत्या. पण त्यांना कोणते आदेश दिले गेले नाही. आझाद मैदानात जे झाले तो सेम पॅटर्न. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अटक नाही. आमचे पोलिस काय मार खाण्यासाठी आहेत आहे का ? देवेंद्र फडणवीसांनी असा संतप्त सवालही केला आहे.
आम्ही सर्वसमावेशकतेचे राजकारण करतो,पण लांगूलचालन करीत नाही. लांगूलचालन करणाऱ्या शक्तींना वाटत असेल की आता आपले सरकार आहे, तर आपण काहीही करू. पण भाजपचा कार्यकर्ता असे होऊ देणार नाही: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis pic.twitter.com/ldmjs2N465 — @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 16, 2021
आम्ही सर्वसमावेशकतेचे राजकारण करतो,पण लांगूलचालन करीत नाही.
लांगूलचालन करणाऱ्या शक्तींना वाटत असेल की आता आपले सरकार आहे, तर आपण काहीही करू. पण भाजपचा कार्यकर्ता असे होऊ देणार नाही: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis pic.twitter.com/ldmjs2N465
ते म्हणाले की, विचारांचा नक्षलवाद आता नाही. आता तो दहशतवाद्यांशी निगडित आहे. भाजपचा कार्यकर्ता कधीही दंगल करीत नाही. पण कुणी अंगावर आले तर सोडणार नाही. आम्ही सर्वसमावेशकतेचे राजकारण करतो, पण लांगूलचालन करीत नाही. लांगूलचालन करणाऱ्या शक्तींना वाटत असेल की आता आपले सरकार आहे, तर आपण काहीही करू. पण भाजपचा कार्यकर्ता असे होऊ देणार नाही.
फडणवीस म्हणाले की, एका मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात, काय चालले आहे महाराष्ट्रात? सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करू. पण सरकारमध्ये केवळ ‘भक्ती‘ उपक्रम चालू आहे. मराठवाडा, विदर्भाच्या सर्व योजना बंद! शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही ! वैधानिक विकास मंडळ बंद! सिंचन, पाण्याच्या योजना बंद ! शेतकऱ्यांची वीज बंद ! शाळा सुरू केल्या आणि लगेच शाळांच्या वीज कापल्या.
ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर कर कमी केला, तर देशातील २५ राज्यांनी त्यात भर घातली. पण महाराष्ट्र मात्र काहीच करायला तयार नाही. हे म्हणतात उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. मंदिर बंद होते, पण दारू सुरू होती ना! त्यातून तुम्ही कमाई केलीच ना. छोटी-छोटी राज्य रडत नाही तर लढतात. महाराष्ट्रात मात्र रोज सकाळी मा. नरेंद्र मोदींचे नाव घेऊन रडतात. बिल्डरांना सवलती देताना यांना GST आठवत नाही, गरिबांना, शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हटले की, जे पैसे टप्प्याटप्प्याने मिळत आहेत आणि मिळत राहतील त्या GSTचे रडगाणे गातात, असेही ते म्हणाले.
मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, १०० कोटी लसीकरण केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे खूप खूप अभिनंदन. अर्थव्यवस्था, लोकांचे जीव वाचवण्यासाठी हे लसीकरण अतिशय आवश्यक होते. हे सोपे काम नव्हते. पण ते भारताने करून दाखविले. पहिल्या दिवशीपासून कोविडचा सामना करताना मा. नरेंद्र मोदीजी यांनी दृढता दाखविली. या महाविकास आघाडी सरकारने सर्वांसोबत विश्वासघात केला आहे. सामान्य माणसाची ताकद आता दाखविण्याची वेळ आली आहे. जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी लढायला मैदानात उतरण्याची वेळ आली आहे.
Devendra Fadnavis criticizes Thackeray government Over Amravati riots, gang rape and murder in State
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App