‘’३६ काय १०० पक्ष एकत्र आले तरीही…’’ देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांच्या I.N.D.I.A आघाडीवर घणाघात!


आतापर्यंत पाच पक्षांनी पंतप्रधान  पदावर दावा ठोकला आहे, असाही फडणवीसांनी टोला लगावला आहे.

विशेष प्रतिनिधी

नागपूर :  विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची आज आणि उद्या मुंबईत बैठक होत आहे. यासाठी जवळपास २८ पक्षांची जमवाजमव करण्यात आली आहे. विरोधी आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा अद्याप निश्चित  झालेला नाही,  विविध पक्ष स्वत:चा नेता पंतप्रधान पदाचा उमेदवार असल्याचे सांगत आहेत. यावरून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना विरोधी आघाडीवर घणाघात केला आहे. Devendra Fadnavis criticizes oppositions I.N.D.I.A

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘’I.N.D.I.A आघाडीला कुठलाही अजेंडा नाही. अजेंडा नसलेली अशाप्रकारीच आघाडी आहे. केवळ मोदीजी हटाव एवढा एकमेव अजेंडा घेऊन ते आले आहेत. पण अशा प्रकारचा अजेंडा कुणी कितीही आणला तरीही लोकांच्या मनात जोपर्यंत मोदीजी आहेत, तोपर्यंत ३६ काय १०० पक्ष एकत्र आले तरीही लोकांच्या मनातून ते मोदींना काढू शकत नाहीत.’’

याचबरोबर ‘’शेवटी पंतप्रधान मोदी लोकांच्या मनात त्यांच्या कार्यामुळे, कर्तृत्वामुळे, नेतृत्वामुळे आणि ज्याप्रकारे देशाला त्यांनी प्रगतीपथावर नेलं आहे, त्यामुळे ते लोकांच्या मनात  आहेत. जो  गरीब कल्याणाचा अजेंडा मोदींनी राबला त्यामुळे ते आहेत. खऱ्या  अर्थाने सामान्य माणसाच्या मनात मोदी आहेत. ज्याप्रकारे आपाला विचार न करता, सर्वस्व देशाकरता  देण्याचं काम मोदींनी केलं म्हणून ते आज लोकांच्या मनात आहेत.’’ असंही फडणवीस म्हणाले.

याशिवाय ‘’म्हणून हे जे काही पक्ष एकत्रित आले आहेत, ते देशाचा विचार करून नाही तर आपली राजकारणातील दुकानं बंद होत आहेत, ती दुकानं कशी वाचवायची यासाठी हे सगळे एकत्र आले आहेत. आतापर्यंत पाच पक्षांनी पंतप्रधान पदावर दावा ठोकलेला आहे. हे पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवू शकत नाहीत आणि यांनी कितीही ठरवला तरी जनतेला पटला पाहिजे ना. यांचा कोणताही उमेदवार जनतेलाही पटत नाही. त्यामुळे ठीक आहे हे एकत्रित येऊन, बॅनरबाजी करून, घोषणाबाजी करून आपलाही टाईमपास ते करत आहेत. पण याचा कोणताही परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही.’’ असं म्हणत फडणवीसांनी विरोधी आघाडीवर निशाणा साधला.

Devendra Fadnavis criticizes oppositions I.N.D.I.A

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!