विशेष प्रतिनिधी
मुंबई – काल पवारांच्या दारी, आज खडसेंच्या घरी; फडणवीसांची चालू आहे राजकीय वारी…!! याची जोरदार चर्चा महाराष्ट्रात रंगू लागली आहे. काल पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे – पवार सरकारला ठोक ठोक ठोकले आणि नंतर लगेच सिल्वर ओकला पोहोचले. त्यांनी शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली. यावर महाराष्ट्रात राजकीय चर्चा रंगली असतानाच आज फडणवीसांनी जळगाव जिल्ह्यातले मुक्ताईनगर गाठून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कोथळी येथील घरी भेट दिली. मुख्य म्हणजे या वेळी त्यांच्या समवेत गिरीश महाजन हे देखील होते. devendra fadanavis visits eknath khadse`s home in muktai nagar, jalgaon dist
मात्र, कालचा पवारांच्या घरी भेट दिल्याचा फोटो स्वतः फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. आजच्या खडसेंच्या घरच्या भेटीचा फोटो त्यांनी अद्याप सोशल मीडियावर शेअर केलेला नाही.
यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने थैमान घातले होते यात केळी बागांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिली. यामुळे फडणवीसांचे सध्या राजकीय पर्यटन सुरू आहे की राजकीय वारी याची चर्चा भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
त्यातही पवारांची भेट एकवेळ साधी सदिच्छा भेट समजू शकते. कारण त्यांच्यावर नुकत्याच शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. पवार बरेच दिवस घरीच विश्रांती घेत आहेत. त्यामुळे फडणवीसांनी त्यांची भेट घेतली. पवार समर्थक पत्रकारांनी त्यावर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गोडवे गाणारे ट्विट केले.
पण खडसेंच्या घरी जाण्याचा विषय तसा नाही कारण एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडताना देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष सोडत असल्याचा थेट आरोप केला होता. भाजपा सोडल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. फडणवीस यांनी देखील खडसेंच्या आरोपांना तोडीस तोड उत्तरे देत सर्व आरोप फेटाळले होते. त्यामुळे अशा परिस्थितीतही फडणवीस यांनी खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App