प्रतिनिधी
मुंबई : मी पुन्हा आलोच पण एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन आलो, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसैनिक एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. Devendra Fadanavis said, I came back again, but now with eknath shinde शिवसेना-भाजप युतीच्या शिंदे – फडणवीस सरकारने सोमवारी झालेल्या बहुमताच्या चाचणीच दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे शिंदे सरकारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलेल्या कामाचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले आहे. अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना फडणवीस सभागृहात बोलत होते.
मी 2019 मध्ये पुन्हा येईन, अशी घोषणा केली होती. पण तेव्हा अनेकांनी माझी टिंगल टवाळी केली. मी पुन्हा आलोच पण यावेळी एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन आलो. माझी टिंगल टवाळी करणाऱ्यांचा मी बदला घेतला. पण माझा बदला हा आहे की मी त्यांना माफ केले आहे, असा टोला त्यांनी लगावला.
DEVENDRA FADANVIS : ती डायरी-‘मातोश्री’अन् 2 कोटी रुपयांचं गिफ्ट…देवेंद्र फडणवीस काय म्हणाले!
कर्मावर विश्वास ठेवणारा नेता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जाज्वल्य विचारांचे पाईक असलेले आणि कर्मावर विश्वास ठेवणारे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. शिंदे उत्तम संघटक आहेत, त्यापेक्षाही ते जनेतेचे सेवक आहेत. बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वात 80 च्या दशकात एकनाथ शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करुन कामाला सुरुवात केली. सातत्याने सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी काम केले आहे, असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक करताना काढले.
समृद्धी महामार्गासाठी मोलाचे योगदान
सीमाप्रश्नाबाबत केलेल्या आंदोलनात देखील एकनाथ शिंदे यांनी कारावास भोगला. 2014 साली मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना एमएसआरडीसीची देण्यात आली. त्यावेळी ही जबाबदारी देऊन एकनाथ शिंदे यांचे पंख छाटल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. पण ज्या व्यक्तीमध्ये कर्तृत्व असते त्याला पद महत्वाचे नसते. त्यांच्याकडे जे काही असेल त्यातून ते विश्वास निर्माण करतात. त्यानुसार एमएसआरडीसीच्या माध्यमातून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः जाऊन कामात येणारे अडथळे दूर केले आहेत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे हे वेगळे रसायन आहे. ते तहान भूक विसरून काम करणारे नेते आहेत. कसोटीच्या क्षणी सुद्धा त्यांनी केलेले काम हे मोलाचं आहे, असे म्हणत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. तसेच येत्या काळात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करतील, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App