प्रतिनिधी
नाशिक – केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्ताराचे आणि फेरबदलाचे निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतले जातात. त्यामध्ये कोण राज कोण नाराज हा प्रश्नच उद्भवत नाही. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या नाराज असण्याचा प्रश्न नाही, उगाच त्यांना बदनाम करू नका, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनाच फटकारले. devendra fadanavis rejects reports of so called unhappiness of munde sisters
नाशिक महापालिकेच्या बस सेवेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी फडणवीस आज शहरात आले असता पत्रकारांनी मुंडे भगिनींच्या कथित नाराजीचा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर फडणवीस यांनी प्रतिप्रश्न केला. ‘मुंडे भगिनी नाराज आहेत असे कोण म्हणते? त्या बिलकूल नाराज नाहीत. उगाच त्यांना बदनाम करू नका. भाजपमधले निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेतले जातात. योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात, असे त्यांनी पत्रकारांना ऐकविले.
नारायण राणे यांना मंत्री बनवताना त्यांच्या कार्यक्षमतेचा विचार केला गेला आहे. दुसरा कुठलाही विचार करण्यात आलेला नाही,’ असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीबद्दल विचारले असता त्यांनी थेट काही बोलणे टाळले. पण या प्रकरणात मी काय बोलणार? मी ईडीचा प्रवक्ता नाही. पुरावे असतील म्हणून ईडी चौकशी करत असेल. कायदा आपले काम करत असतो. भाजपमध्ये अशा प्रकारे सुडाने काम करण्याची पद्धत नाही, असे सूचक उद्गार त्यांनी काढले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App