विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोरोनाच्या डेल्टा प्लस हा प्रकार तिसऱ्या लाटेसाठी प्रमुख कारण ठरू शकतो. म्हणूनच या कोरोना व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये, याची खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना महापालिकेने सुरू केल्या आहेत. पालिकेने पुन्हा चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून दुसऱ्या लाटेच्या तुलनेत या वेळी दुप्पट क्षमतेने चाचण्या करणार आहेत. Delta Plus virant enters in Mumabai
मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत कोरोना डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण सापडू लागले आहेत. सध्या मुंबईत दररोज सरासरी ३० हजार लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे. दुसऱ्या लाटेमध्ये चाचण्यांची संख्या ५० हजारांवर गेली. या वेळी चाचण्या यापेक्षा अधिक वाढवल्या जाणार आहेत.
जास्त गर्दी असलेल्या भागात, झोपडपट्ट्यांमध्ये आणि निवासी भागात चाचण्या वाढवल्या जाणार आहेत. सध्या मुंबईतील मॉल बंद असून पुन्हा सुरू झाल्यास येथेही कोव्हिड चाचण्या घेतल्या जातील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App