विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचे जनमत दिले आहे. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्याकडूनही अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी मागणी केली जात असल्याचे आमच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. अशातच आता यावर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनीही भाष्य केले आहे.
एकनाथ शिंदेंना प्रथम प्राधान्य द्यायला हवे – केसरकर
केसरकर म्हणाले की, ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवली गेली आहे. या निवडणुकीत जनतेनेही चांगला कौल दिलेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आम्ही नेहमीच विचार करतो की, एकनाथ शिंदे यांना प्रथम प्राधान्य द्यायला हवे. तसेच, आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर जेवढे प्रेम करतो, तेवढेच प्रेम आणि विश्वास आमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
Nana Patole विधानसभेतील पराभवावर चिंतन करू, जनतेच्या प्रश्नांसाठी यापुढेही काम करू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया
फडणवीस-शिंदे जोडीला देवाचाही आशीर्वाद – केसरकर
ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांची जोडी आहे. हे बघा, या जोडीने काय चमत्कार करून दाखवला. अजितदादा हे नंतर सहभागी झाले. त्यामुळे अजितदादांनाही याचे क्रेडिट आहे. पण हे दोघे पहिल्यापासूनच सोबत चालत आहेत. ही जोडी कायम राहील आणि त्यांना देवाचाही आशीर्वाद आहे.
संजय राऊतांसारखे बोलले तर…
दरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षाचा दावा असणार आहे का? असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता केसरकर यांनी सांगितले की, बघा मी फार छोटा माणूस आहे. संजय राऊतसारखे बोलायला लागलो, तर लोक मलासुद्धा तसेच मानून चालले असते. मी एक जबाबदार प्रवक्ता आहे आणि त्यामुळे जबाबदारीने बोलेन एवढे मी सांगतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App