विशेष प्रतिनिधी
सांगली : सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद पेटला आहे.अंगावर याल तर शिंगावर घेऊ असा इशारा शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. Dattatraya Bharane’s statement sparked controversy, Shiv Sena warns NCP
मुख्यमंत्री मरु द्या, माझ्या अजितदादांना आशिर्वाद द्या’ असे आक्षेपार्ह विधान भरणे यांनी केले होते. सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी याचा निषेध करताना ‘अंगावर याल तर शिंगावर घेऊ’ असे आव्हानच थेट राष्ट्रवादीला दिले आहे.
विभुते यांनी म्हटले आहे की, भरणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. जर ते अंगावर आले तर त्यांना शिंगावर घेऊ. खरंतर त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आले आहे.
राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर सत्तेत राहून शिवसेनेलाच त्रास देत आहे. दत्तामामांच्या रुपाने आलेले विधान राष्ट्रवादीचेच आहे. भाजपने शिवसेनेशी गद्दारी केली नसती तर आज राष्ट्रवादी नामशेष झालेली असती, परंतु शिवसेना पक्षप्रमुखांनी महाविकास आघाडी केली आणि सत्तेत हे दोन्ही पक्ष आले. आम्ही सातत्याने पाठीमागचा इतिहास विसरून एकोप्याने राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय,
परंतु राष्ट्रवादी मात्र शिवसेनेबरोबर कधीही इमानदारीने राहात नाही हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने शिवसेनेचा नाद अजिबात करू नये. शिवसेनेने राष्ट्रीय पक्षाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. राष्ट्रवादी तर प्रादेशिक पक्ष आहे. महाविकास आघाडीत आम्ही सत्तेत जरी राष्ट्रवादीबरोबर असलो तरी एकही शब्द मुख्यमंत्री व शिवसेनेच्याबाबतीत खपवून घेणार नाही. हे राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याने आणि दत्तामामांनी लक्षात ठेवावे. उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादीने व दत्तामामांनी जाहीर माफी मागावी.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App