वीज ग्राहकांच्या पाठीत खंजीर खुपसून ऊर्जामंत्री यांची चार्टर विमानातून मौजमजा, भाजपचे विश्वास पाठक यांचा आरोप ; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

वृत्तसंस्था

मुंबई : वीजबिल भरले नाही म्हणून एकीकडे गोरगरीब शेतकऱ्यांचे जोडणी तोडली जात आहे. मात्र राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे वाढीव विजबिलाबाबत तोडगा काढण्याऐवजी वीज कंपन्यांच्या चार्टर विमानाने फेरफटका मारुन मौजमजा लुटत आहेत, अशी तक्रार भाजपचे माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी पोलिस ठाण्यात केली.

राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना गोंधळ टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जोपर्यंत वीजबिलाबाबत अधिवेशनात चर्चा होत नाही. तोपर्यंत वीजबिल तोडण्यात येणार नाही, असे सांगितले.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मात्र भूमिकेपासून यू टर्न घेतला आणि वीजबिल भरावेच लागेल अन्यथा वीज कनेक्शन तोडले जाईल, असे सांगून ग्राहकांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना ऊर्जामंत्री मात्र, ग्राहकांना वाऱ्यावर सोडून वीज कंपन्यांनी दिलेल्या चार्टर विमानातून मौजमजा करत फिरत असल्याचे उघड झाले आहे.


याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची माहिती देताना पाठक म्हणाले, राज्यातील जनता विजबिलाच्या ओझ्याखाली प्रचंड दबली आहे. वीजबिल कसे व कोठून भरायचे याची विवंचनेंत जनता पडली आहे.

विजबिलाच संकट दूर करण्यासाठी आता उर्जामंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. परंतु ते मात्र, स्वतः वीज कंपन्यांच्या चार्टड विमानाने फिरुन मौज करत आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र भाजप माध्यम प्रमुख म्हणून मी विश्वास पाठक यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

BJP Vishwas Pathak having fun from the illegal plane of the energy minister

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*