म्हाडा परीक्षेची तारीख पुन्हा बदलली ;७ फेब्रुवारीपासून सुरू होणारी परीक्षा आता ३१ जानेवारीपासूनच ऑनलाईन, असे करा प्रवेशपत्र डाऊनलोड


म्हाडा भरती परीक्षेवरून गोंधळ अद्याप थांबलेला नाही. वारंवार परीक्षेची तारीख बदलत असल्याने परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आता परत एकदा वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही भरती परीक्षा आता ३१ जानेवापासूनच ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. ही परीक्षा आता ३१ जानेवारी, २ फेब्रु., ३ फेब्रु., ७ फेब्रु., ८ फेब्रु. आणि ९ फेब्रुवारी या ६ दिवसांमध्ये घेण्यात येणार आहे.Date of MHADA exam changed again Exam starting from 7th February is now online from 31st January, Download Admission Form


वृत्तसंस्था

मुंबई : म्हाडा भरती परीक्षेवरून गोंधळ अद्याप थांबलेला नाही. वारंवार परीक्षेची तारीख बदलत असल्याने परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आता परत एकदा वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही भरती परीक्षा आता ३१ जानेवापासूनच ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. ही परीक्षा आता ३१ जानेवारी, २ फेब्रु., ३ फेब्रु., ७ फेब्रु., ८ फेब्रु. आणि ९ फेब्रुवारी या ६ दिवसांमध्ये घेण्यात येणार आहे.

म्हाडाची ही परीक्षा ५६५ पदाकरिता होणार आहे. आधी ऑफलाईन होणारी परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे. म्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी टीसीएस या नामांकित कंपनीवर सोपवण्यात आली आहे. विविध परीक्षांचा अनुभव असलेल्या टीसीएसला हीजबाबदारी देण्यात आली आहे.



यापूर्वी जीए सॉफ्टवेअर या कंपनीकडे जबाबदारी होती, परंतु पेपरफुटी घोटाळा उघड झाल्याने त्यांचे काम काढून घेण्यात आले आहे. यामुळे म्हाडाकडून ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्यात आली. या परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक आणि इतर सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

असे करा प्रवेशपत्र डाऊनलोड

ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी म्हाडाच्या https.mhada.gov. in या संकेतस्थळावर २२ जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया सोयीची ठरावी याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर २६ जानेवारीपासून मॉक लिंकही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रवेश पत्राची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/31659/75245/login.html

मॉक टेस्टची लिंक
https://g06.tcsion.com:443//OnlineAssessment/index.html?31659@@M211

मॉक लिंकद्वारे उमेदवारांना परीक्षेचे साधारण स्वरूप समजून घेता येणार असून ऑनलाइन परीक्षा कोणत्या पद्धतीने द्यावी याविषयी माहिती देण्यात आली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मध्यरात्री ट्वीट करत ही परीक्षा पुढे ढकलली होती. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली होती. याविषयी त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता.

Date of MHADA exam changed again Exam starting from 7th February is now online from 31st January, Download Admission Form

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात