पौराणिक काळातले कोपगृह आधुनिक काळात सातारा जिल्ह्यातल्या दरेगावात अवतरले काय??

Daregaon

नाशिक : पौराणिक काळामध्ये राजा महाराजांच्या भव्य दिव्य महालांमध्ये अस्तित्वात असलेले कोपगृह आधुनिक काळामध्ये सातारा जिल्ह्यातल्या दरे या गावात अवतरले की काय??, असा सवाल विचारण्याची वेळ महाराष्ट्राच्या राजकारणातल्या शिवसेना नेत्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी आणली.

पौराणिक काळामध्ये राजा – महाराजांच्या भव्य दिव्य महालांमध्ये विशिष्ट कोपऱ्यांमध्ये कोपगृहे असायची. त्यावेळच्या राजा – महाराजांना असलेल्या अनेक राण्यांपैकी एखादी राणी रुसली की ती कोपऱ्यातल्या कोपगृहात जाऊन बसायची. तेव्हा राजाला समजायचे आपली एक राणी चिडली आहे. मग तो त्याच्या सोयी-सवडीनुसार आणि राणी किती लाडकी आहे, त्यानुसार तिची समजूत काढायला राजा त्या कोपगृहात जायचा. तिची जी काही मागणी असेल, ती पूर्ण करून तिला कोपगृहाच्या बाहेर घेऊन यायचा. याच्या अनेक कहाण्या भारतीय पुराणांमध्ये ठाई ठाई पेरल्या आहेत. रामायणात राणी कैकयीचे कोपगृह तर खूप (कु)प्रसिद्ध आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतली अमित शाह यांच्या घरची बैठक आटोपून मुंबई आले. त्यांनी “वर्षा” निवासस्थानी काही लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर ते सातारा जिल्ह्यातल्या आपल्या मूळच्या दरे या गावला निघून गेले. त्यानंतर माध्यमांनी जे तर्कवितर्क लढविले. ती बाब अलग, पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्याच नेत्यांनी प्रसार माध्यमांमधून वेगवेगळी वक्तव्य करून शिंदेंच्या दरे गावाची जी माध्यमांमध्ये प्रतिमा निर्मिती केली, ती मात्र पौराणिक काळातले कोपगृह दरे या गावच्या रूपाने आधुनिक काळात अवतरले की काय??, अशी शंका निर्माण करणारी ठरली.


Imtiaz Jalil ईव्हीएमवर निवडणुका घेऊ नका, ताकद कळेल, इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा


शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, माजी मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई आदी नेत्यांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यापासून गृहमंत्री पदाच्या दाव्यापर्यंत अनेक वक्तव्य केली. त्यातल्या प्रत्येकाने एकनाथ शिंदे नाराज नसल्याचे आवर्जून सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जो काही निर्णय घेतील, तो मान्य असेल, हे स्वतः एकनाथ शिंदे यांनीच स्पष्ट केले, याकडे या सगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या वेळी लक्ष वेधले.

पण या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे कुठलीही अडचणीची बाब असली आणि तिच्यातून मार्ग काढायचा असला की आपल्या मूळ गावी दरेगावला जातात. तिथे ते कुणाला भेटत नाहीत, कुणाचा मोबाईल फोन आला तरी तो घेत नाहीत, तर शांतपणे विचार करून मग निर्णय घेतात, अशी पुस्ती जोडली. ही पुस्ती जोडल्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या दरे या गावाची प्रतिमा पौराणिक काळातल्या कोपगृहासारखी झाली असल्यास नवल नाही.

– माध्यमांना बाईट आणि सरकार

या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईतल्या पत्रकार परिषदेत एकच ठोका टाकला. माध्यमांना बाईट देऊन सरकार किंवा मंत्रिमंडळ बनत नाही. त्याची स्वतंत्र प्रक्रिया असते. त्यामुळे मी किंवा अन्य कुठल्याही नेत्याने माध्यमांना बाईट दिला, तर त्याने सरकार बनविण्याच्या प्रक्रियेत काही फरक पडत नाही, असे बावनकुळे यांनी एकाच वेळी माध्यमांना आणि शिवसेनेच्या नेत्यांना सुनावले. यातून एकनाथ शिंदे दरेगावात जावोत किंवा कोपगृहात जावोत, त्याने काही फरक पडणार नसल्याचे बावनकुळे यांनी परस्पर सूचित करून टाकले.

पण ते काही का असेना, एकनाथ शिंदेंच्या दरेगावला जाण्याच्या निमित्ताने ते गाव चर्चेत आले आणि पौराणिक काळातल्या कोपगृहाची आठवण आधुनिक काळात ताजी झाली!!

Daregaon, modern times anger calming home

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात