पुण्यातील रिक्षाचालकांनी दादा क्या हुवा वो वादा ? आंदोलन सुरू केले आहे बाईक टॅक्सी बंद करण्याचे आशवासन पाळले नसल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे. Dada, kya hua tera Vada, agitation of autoriksha drivers for not keep its promise to stop bike taxis
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील रिक्षाचालकांनी दादा क्या हुवा वो वादा? आंदोलन सुरू केले आहे बाईक टॅक्सी बंद करण्याचे आशवासन पाळले नसल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे. 4 फेब्रुवारी रोजी विधानभवन येथे निदर्शने करून डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालकांनी मोर्चा काढला होता. पालकमंत्री अजित पवार यांनी बेकायदा बाईक टॅक्सी अाठ दिवसात बंद करण्याचे आश्वासनदिले होते.
या गोष्टीला आता एक महिना झाला तरी प्रशासनाने कागदी घोडे नाचवण्याशिवाय काहीही केले नाही. प्रत्यक्षात बेकायदा बाईक टॅक्सी जोरात सुरू आहेत. त्यामुळे आधी दादा मला वाचवा असे आंदोलन करणाऱ्या रिक्षाचालकांनी आता दादा क्या हुवा वो वादा ? असे आंदोलन सुरू केले आहे. सरकारचा निषेध म्हणून हातावर व डोक्यावर “दादा क्या हुवा वो वादा” आणि “मेरा सरकार चोर है” असे टॅटू हजारो रिक्षाचालकांनी बनवले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App