तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी, राज्य सरकारचा निर्णय ; नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा


वृत्तसंस्था

मुंबई : तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शेतकऱ्यांना बिनव्याजी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. Crop loans up to Rs 3 lakh interest free, decision of the state government; Relief to regular repaying farmers

केंद्र आणि राज्य शासन देत असलेली प्रत्येकी ३ टक्के व्याजदर सवलतीचा एकत्रित फायदा मिळाल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत सुधारणा केली आहे.उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केली होती. पीककर्जावर एकूण ६ टक्के व्याज आकारले जाते. त्यातील तीन टक्के व्याज सवलत केंद्र सरकार देते. आज राज्य शासनाने तीन टक्के सवलतीचा निर्णय घेतल्याने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य व्याज पडणार आहे.

Crop loans up to Rs 3 lakh interest free, decision of the state government; Relief to regular repaying farmers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात