कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी; निकालाकडे सर्वांच्या नजरा

Voting result

२६ मार्च रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान झाले होते.

प्रतिनिधी

पुणे : राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकीचा निकाल आज(२ मार्च) जाहीर होणार आहे. या दोन्ही ठिकाणच्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष्य लागले आहे. २६ मार्च रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान झाले होते. Counting of votes for Kasba Chinchwad assembly by election today

या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  शिवाय विजयी मिरवणुकीसह मनाई करण्यात आली आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे हेमंत रासने  आणि महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. याशिवाय मतदानाच्या दिवशी घडलेल्या हाणामारीच्या घटना, रविंद्र धंगेकराकडून भाजपावर करण्यात आलेला पैसे वाटपाचा आरोप, दिग्गज नेत्यांच्या प्रचार रॅली या सगळ्या पार्श्वभूमीवर या निवडणूक निकालाकडे  सर्वांच्या नजरा आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालायात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताचा आढावाही घेतला.


उद्धव ठाकरे हे सुद्धा या विधिमंडळाचे सदस्य आहेत, मग संजय राऊत त्यांनाही चोर ठरवणार आहेत का?” फडणवीसांचा थेट सवाल!

 

चिंचवड पोटनिवडणूकही चुरशीची –

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचीही आज निकाल आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होईल. मतमोजणी सुरू होण्याच्या वेळेपर्यंत प्राप्त होणाऱ्या टपाली मतदानाची मोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे चित्र दुपारी चार वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.

थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत. सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे आणि बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे  यांच्यात या जागेसाठी लढत झाली.

Counting of votes for Kasba Chinchwad assembly by election today

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात