Coronavirus : राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बाधित होणाऱ्यांपेक्षा दुप्पट; आकडेवारीत बाब स्पष्ट


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली आहे.बाधितांच्या संख्येत घट होत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या शनिवारी दुप्पट होती. Coronavirus 2 thousand 148 patients were cured from corona in a day in the state

राज्यात शनिवारी २ हजार १४८ रूग्ण कोरोनामधून बरे झाले असून, १ हजार १३० नवीन बाधित आढळले आहेत. याशिवाय,२६ रूग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आजपर्यंत ६४,४९,१८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.५७ टक्के आहे. बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०९,९०६ आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०१९६ रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या मृत्यूदर २.१२ टक्के आहे.

तपासलेल्या ६,२५,५९,१७१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०९,९०६(१०.५७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६७,०६४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १६,९०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Coronavirus 2 thousand 148 patients were cured from corona in a day in the state

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*