वृत्तसंस्था
नवी दिल्ली – मुंबई : कोरोनाचा वाढत्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी दिल्ली – मुंबईत अतिउच्चस्तरीत बैठका होत असून त्यात लॉकडाऊनपासून कठोर निर्बंध लादण्यापर्यंतच्या पर्यायांवर चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे, तर मुंबईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. corona lockdown high level meeetings held in new delhi and mumbai
महाराष्ट्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उपद्रव झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील स्थितीही चिंताजनक असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाउन लावू असा इशारा दिला होता. दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे ठाकरे म्हणाले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी तीन वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत लॉकडाउन संदर्भातील निर्णय होणार असल्याची दाट शक्यता आहे. या बैठकीनंतर त्याची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
लॉकडाउनचे दिले होते संकेत
शुक्रवारी जनतेशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी दोन सत्रांत उद्योजकांसह प्रसारमाध्यमे, व्यायामशाळा चालक, मराठी नाट्य निर्माता संघ तसेच त्यानंतर राज्यातील मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृह चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी स्वयंशिस्त पाळली असती, तर आजची स्थिती आली नसती. लसीकरणातही आपण सर्वात पुढे आहोत. नुकसान तर पूर्ण राज्याचे होणार आहे. ‘जिंदगी, जान उसके बाद काम,’ याप्रमाणे पुढे जावे लागेल. त्यासाठी आता काही पावले उचलावीच लागतील. परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावे लागतील.
लोकांमध्ये करोनाविषयी जागरूकता निर्माण करावी लागेल. भीती गेली हे चांगले झाले. पण त्यामुळे बेफिकिरी वाढली आहे. या विषाणूचा संसर्ग धोकादायक हे सांगण्याची वेळ आली आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनबद्दलचे संकेत दिले होते. सरकारच्या निर्णयाला सहकार्य करण्याची विनंती सर्व क्षेत्रातील प्रतिनिधींना केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App