लग्न करून घरी आणले आणि बायकोला दहशतवाद्यांना विकून टाकलं, केरळमधील लव्ह जिहादमुळे ख्रिश्चन समाज संतप्त

लग्न करून बायकोला आणले आणि काही वेळातच बायकोला दहशतवाद्यांना विकून टाकल्याचा प्रकार घडल्याच्या चर्चेने केरळमधील ख्रिश्चन समाज संतप्त झाला आहे. एका मुस्लिम तरुणाच्या प्रेमात पडून ही मुलगी पळून गेली होती.Married and brought home and sold wife to terrorists, Love Jihad in Kerala angers Christian community


विशेष प्रतिनिधी 

एर्नाकुलम : लग्न करून बायकोला आणले आणि काही वेळातच बायकोला दहशतवाद्यांना विकून टाकल्याचा प्रकार घडल्याच्या चर्चेने केरळमधील ख्रिश्चन समाज संतप्त झाला आहे. एका मुस्लिम तरुणाच्या प्रेमात पडून ही मुलगी पळून गेली होती.

केरळमधील विविध ख्रिश्चन ग्रुपमध्ये सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबत घडलेली घटना अशी की एक तरुणी मुस्लिम मुलाच्या प्रेमात वेडी होऊन पालकांचा विरोध असल्याने त्याच्यासोबत पळून गेली.लग्न करून या तरुणाच्या घरी ती गेली. त्यानंतर काही वेळातच कुर्ता-पायजमा आणि गोल टोपी परिधान केलेला तिचा नवरा आला. त्याने या मुलीच्या कपाळावरील बिंदी काढली, चेहरा दुप्पट्याने झाकला. काही वेळातच एक टोळके आले. तरुणाचे त्यांच्याशी बोलणे आणि त्याने बायकोला विकून टाकले.

सध्या हा व्हिडीओ केरळमधील अनेक ख्रिश्चन समाजाच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर ख्रिश्चन असोसिळशन अ‍ॅँड अलायन्स फॉर सोशल अ‍ॅक्शन या संघटनेने फेसबुकवर हा व्हिडीओ टाकून लव्ह जिहादचा पर्दाफाश केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वातील डावी आघाडी आणि कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील लेकशाही आघाडी यांनी आजपर्यंत केलेल्या मुस्लिम तृष्टीकरणाचीच ही फळे आहेत. लव्ह जिहादच्या नावाखालील दहशतवादाला त्यांनी पाठिंबा दिला.

त्यामुळे राज्यात लव्ह जिहादचा दहशतवाद वाढत आहे. त्यांना पोसणारी मुळेच छाटून टाकण्याची गरज आहे.गेल्याच वर्षी केरळमधील सर्वात मोठ्या असलेल्या सिरो मलबार चर्चने याबाबत एक पत्रक जारी केले होते. ख्रिश्चन महिलांना लव्ह जिहादचे लक्ष्य केले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.

गैरमुस्लिम मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न करण्याच्या षडयंत्राला लव्ह जिहाद असे म्हटले जाते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच लव्ह जिहादविरोधी कडक कायदा केला आहे.

भिन्न धर्मियांच्या विवाहसाठी एक महिना अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडे नोटीस देणे बंधनकारक केले आहे. यासाठी कडक शिक्षेचीही तरतूद केली आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांनीही लव्ह जिहादविरोधी कायदा केला आहे. मात्र, कॉँग्रेसने या कायद्याला विरोध केला आहे.

Married and brought home and sold wife to terrorists, Love Jihad in Kerala angers Christian community

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*