वृत्तसंस्था
पुणे : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. परंतु अशाही परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील 444 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. कोरोनाच्या संसर्गानंतर ग्रामस्थांनी नियमांचे काटेकोर पालन केले. त्यामुळे गावांतून कोरोना हद्दपार झाला आहे. Corona free 444 villages in Pune district
या गावांत सक्रिय रुग्णांचे प्रमाण शून्य आहे. जिल्ह्यात 1 हजार 404 ग्रामपंचायती आहेत. त्यातली 444 गावे म्हणजेच 31.62 टक्के गावे आता कोरोनामुक्त झाली. संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर भोर तालुक्यातील सर्वाधिक 101 गावे कोरोनामुक्त आहेत.
तर सर्वाधिक कमी गावे शिरूर तालुक्यात आहेत. तेथील 10 गावांमधील रुग्णांची संख्या शून्य झाली आहे. याशिवाय आंबेगाव तालुक्यात 19, बारामतीमध्ये 16, भोर येथे 101, दौंड तालुक्यात 12, हवेलीतील 22, इंदापूरमधील 27, जुन्नर येथील 11, खेडमधील 62, मावळ येथील 62, मुळशीमधील 24, पुरंदरयेथील 22, शिरूर येथील 10 तर वेल्हा येथील 56 गावेही कोरोनामुक्त आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App