Pandharpur election 2021 voting live : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू; प्रवासाला मुभा


  • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज, शनिवारी मतदान होत आहे.
  • मागील अनेक दिवसांपासून ज्या निवडणूकीची जय्यत तयारी, सभा सुरू होत्या तो दिवस आज (१७ एप्रिल) आला आहे.
  • पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू झाले आहे.
    या निवडणूकीत राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली असून भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच पोटनिवडणूक आहे. Pandharpur election 2021 voting live

या पोटनिवडणुकीसाठी ३ लाख ४० हजार ८८९ मतदार असून ते ५२४ मतदान केंद्रांवर मतदान करू शकतील.

या पोटनिवडणुकीत १९ उमेदवार आपले नशीब आजमावत असले, तरी मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यातच आहे. ही पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली असून, या निमित्ताने महाविकास आघाडीला धक्का देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर पंढरपूरची जागा राखण्यासाठी राष्ट्रवादीने शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत.निवडणुकीसाठी २५५२ अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कर्मचारी व मतदान साहित्य वाहतुकीसाठी ९४ एसटी बस व तीन जीपची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती गुरव यांनी दिली.

मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेसा वीजपुरवठा, शौचालय, दिव्यांगासाठी रॅपची सुविधा करण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने मतदान केंद्रावर करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, मुखपट्टी आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती गुरव यांनी दिली.

मतदानासाठी प्रवास करण्यास मुभा

दरम्यान, पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदारसंघाचे मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवास करून मतदारसंघात येऊ द्यावे, अशा सूचना राज्य सरकारने प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.

Pandharpur election 2021 voting live

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण