कंत्राटी भरतीचे जंजाळ; पण ज्यांनी सुरू केली, तेच करताहेत आज बवाल!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कंत्राटी भरतीचे जंजाळ, पण ज्यांनी सुरू केली तेच करताहेत आज बबाल!!, असे म्हणायची वेळ आली आहे. कारण कंत्राटी भरती शिंदे – फडणवीस सरकारने किंवा त्याआधीच्या फडणवीस सरकारने सुरू केलेली नसून ती राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना शरद पवारांच्या पाठिंब्यावर विलासराव देशमुख आणि जयंत पाटील यांनी सुरू केली होती. ontractual recruitment was started by vilasrao deshmukh and supported by sharad pawar and jayant patil, now both oppose the same they started

आता त्या कंत्राटी भरती सुरू करण्याला देखील 20 वर्षे झाली आहेत. विलासराव देशमुख आज हयात नाहीत, पण ज्यांनी त्यावेळी कंत्राटी नोकर भरतीला पाठिंबा दिला आणि अंमलबजावणीला सुरुवात केली, तेच शरद पवार आणि जयंत पाटील कंत्राटी भरतीला आज विरोध करताना दिसत आहेत.

विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कंत्राटी भरती सुरू झाली त्यावेळी अर्थमंत्री होते, जयंत पाटील. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्याची आर्थिक ताण पडत असल्याने “झीरो बजेट” धोरण जाहीर केले. काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे तेव्हा सरकार होते. या सरकारनेच शासकीय नोकऱ्यांमध्ये कंत्राटी पद्धत आणली.

  • शैक्षणिक क्षेत्र :

शिक्षक : 10 मार्च 2000 ला प्राथमिक व 27 एप्रिल 2000 रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक योजना सुरू केली.

या अंतर्गत 3 वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम केल्यावरच सेवेत कायम होता येते. दर वर्षी शिक्षकांचे री जॉइनिंग होत असते. सुरवातीचे 3 वर्षे 3000 रुपयांवर काम करावे लागत असे.

प्राध्यापक : तब्बल 20 वर्षांपासून महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने प्राध्यापक भरती चालू होती. प्रति तासिका 500 रुपये पगार प्राध्यापकांना मिळायचा. रोहित पवारांच्या कॉलेजमध्ये शेकडो शिक्षक, प्राध्यापक कंत्राटी मिळतील.

  •  परिवहन क्षेत्र :

एसटी महामंडळ मध्ये सर्व वाहक आणि चालक दोघेही कंत्राटी पद्धतीने तब्बल 20 वर्षांपासून काम करत आहेत. सुरवातीचे तीन वर्षे फक्त 3000 रुपयांवर काम करावे लागते.

  •  आरोग्य

नर्सेस : राज्यात सर्व नर्सेस गेली 20 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. याच बरोबर डॉक्टर सुद्धा कंत्राटी पध्दतीनेच भरती करण्यात येतात. आरोग्य सेवेतील ड्रायव्हर देखील कंत्राटी भरतीने भरती करण्यात आले आहेत.

NRHM : मागील 20 वर्षांपासून NRHM मधील सर्व पदे ही कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहेत.

  •  ग्राम विकास :

– ग्रामसेवक : ग्रामसेवक हे पद देखील कंत्राटी पद्धतीने नोकर भरती होत आहे मागील 20 वर्षांपासून हेच सुरू आहे.

  •  कृषी क्षेत्र

कृषी सहाय्यक ही पदे देखील कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आले आहेत.

मात्र या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून शरद पवार खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आदी नेते आज कंत्राटी नोकर भरतीला विरोध करत आहेत. विलासराव देशमुख सरकारच्या काळात सुरू झालेले कंत्राटी नोकर भरतीचे धोरण ठाकरे पवार सरकारने देखील पुढेच तसेच चालू ठेवले.

काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी पद्धतीच्या जीआर संबंधी वस्तू श्री सांगून कंत्राटी भरतीचे पाप नेमके कोणाचे हे जनतेसमोर उघड्यावर आणले. त्यानंतर ठाकरे – पवारांच्या गोटात खळबळ माजली. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर आपल्या जुन्या सहकाऱ्यांना आणि नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत.

ontractual recruitment was started by vilasrao deshmukh and supported by sharad pawar and jayant patil, now both oppose the same they started

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात