महाविकास आघाडीत सर्वांत जास्त जागा जिंकल्या काँग्रेसने; आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचेच नेते साईड ट्रॅकला!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या काँग्रेसने पण यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झालेल्या आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे नेतेच साईड ट्रॅक वर ढकलले गेले. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार नाराज असल्याने ते यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बैठकीला गेलेच नव्हते. त्यांच्या ऐवजी पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे नेते तिथे हजर होते. बैठकीत विधानसभा निवडणुकी संदर्भातल्या जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली, एवढे एकच वाक्य पृथ्वीराज चव्हाण यांनी उच्चारले. जनतेचे आभार मानण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचे ते म्हणाले.Congress won maximum number of seats in Mahavikas Aghadi



संपूर्ण पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांच्या भोवतीच केंद्रित राहिली. पत्रकारांनी जास्तीत जास्त प्रश्न उद्धव ठाकरे यांनाच विचारले. शेवटी उद्धव ठाकरेंनाच आता पवार साहेबांना प्रश्न विचारा, ते उत्तरे देतील, असे सांगावे लागले. त्यानंतर शरद पवारांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. त्यातला एक प्रश्न शिखर बँक घोटाळे संदर्भातल्या क्लोजर रिपोर्ट बद्दल होता क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे याकडे तुम्ही कसे पाहता??, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही एवढे संक्षिप्त उत्तर पवारांनी दिले. त्यावेळी त्यांच्या शेजारी शिखर बँक घोटाळा बाहेर काढणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बसले होते. त्यांच्या शेजारी बसून पवारांनी त्यावर अधिक भाष्य करणे टाळले.

महाविकास आघाडीत लहान भाऊ – मोठा भाऊ असला प्रकार नसल्याचा दावा सगळ्याच नेत्यांनी केला. उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडून महायुतीत जाणार असल्याच्या बातम्या आल्या, त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शेजारी बसून मी जाणार असे उत्तर देऊ का??, असा टोला त्यांनी पत्रकारांनाच हाणला.

महाविकास आघाडी एकत्रितरित्याच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाईल असा निर्धार सगळ्या नेत्यांनी व्यक्त केला, पण जागावाटप संदर्भात कुठलाही ठोस निर्णय त्यांनी जाहीर केला नाही. किंवा मुख्यमंत्री कोण??, कोणाचे नाव पुढे??, वगैरे प्रश्नांवर देखील नेमकी उत्तरे दिली नाहीत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक यश काँग्रेसला मिळाले. हाताच्या पंजा या चिन्हावर त्यांच्या 13 जागा निवडून आल्या. विशाल पाटील अपक्ष निवडून आले असले तरी त्यांनी काँग्रेसलाच पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्रातील संख्या 14 खासदारांची झाली. असे असताना देखील काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या पत्रकार परिषदेत साईड ट्रॅक वरच बसलेले दिसले.

Congress won maximum number of seats in Mahavikas Aghadi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात