विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान टिकवून ठेवताना शरद पवारांनी पुणे जिल्ह्यातल्या राजकारणावर वर्चस्व निर्माण केले, पण पुणे शहरावर मात्र पवारांना तेवढे वर्चस्व मिळवता आले नाही. ऑकिंबहुना पुणे शहरात काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचा बोलबाला आणि वर्चस्व राहिले. त्या तुलनेत पवारांची अखंड आणि फुटलेली राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानावरच राहिली.
आता देखील पुणे शहरात विधानसभेच्या 8 मतदारसंघांपैकी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला फक्त 2 मतदारसंघ येणार आहेत. हडपसर आणि पर्वती मध्ये महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्या पलीकडे पुणे शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे स्थान नाही. पण केवळ 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पवारांच्या पक्षाचा स्ट्राइक रेट फारच चांगला राहिला, म्हणजे त्यांनी लोकसभेच्या 48 पैकी 10 जागा लढवून 8 जागा जिंकल्या म्हणून पवारांच्या पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुणे शहरात पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून लढणाऱ्या इच्छुकांची संख्या 41 झाली आहे.
Maharashtra :केंद्र सरकारचेही ‘महाराष्ट्र प्रथम, मराठी प्रथम’ हे ब्रिद, महत्वाच्या योजना मान्य, गुंतवणूकीतही वाढ
त्या उलट पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादी पेक्षा कितीतरी बळकट असलेल्या काँग्रेसकडे मात्र 24 इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. पण यामध्ये हौशा नौशा इच्छुकांपेक्षा गांभीर्याने निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची संख्या जास्त असल्याचे काँग्रेसमधल्या सूत्रांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुणे शहरात फारसे स्थान नाही, तरीदेखील त्यांच्या शिवसेनेकडे 20 इच्छुकांनी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App